पवारांच्या निसर्ग, विज्ञान कविता हा ग्रंथ साहित्य क्षेत्राला दिशादर्शक ‌ होईल -आमदार धीरज देशमुख पवारांच्या दर्जेदार निसर्ग व विज्ञान कवितामुळे जामखेडच्या लौकिकात मोठी भर 

0
178

जामखेड न्युज——

पवारांच्या निसर्ग, विज्ञान कविता हा ग्रंथ साहित्य क्षेत्राला दिशादर्शक ‌ होईल -आमदार धीरज देशमुख

पवारांच्या दर्जेदार निसर्ग व विज्ञान कवितामुळे जामखेडच्या लौकिकात मोठी भर 

प्रसिद्ध कवी आ.य.पवारांनी आपल्या निसर्ग व विज्ञान कवितांतून सतत नावीन्याचा शोध घेतला आहे.राष्ट्रीय चर्चासत्राच्या निमित्ताने त्यांच्या कवितेवर नामवंत समीक्षक व अभ्यासक, संशोधकांनी मांडलेल्या विचारांचा आ.य.पवारांच्या निसर्ग व विज्ञान कविता ‘ हा संपादित केलेला ग्रंथ साहित्य क्षेत्राला दिशादर्शक होईल ” असे प्रतिपादन आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी लातूर येथे ग्रंथ प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षीय भाषणात केले.

नगर जिल्ह्यातील जामखेड येथील प्रसिद्ध कवी आ.य.पवार यांच्या निसर्ग व विज्ञान कवितावर
दिनांक ५ मे २२ रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व व्यंकटराव देशमुख महाविद्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॉ राम वाघ यांचे अध्यक्षतेखाली राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन लातूर येथे करण्यात आले होते.

राज्य व राज्याबाहेरील विद्यापीठातील प्राध्यापकासह विविध जिल्ह्यांतील महाविद्यालयांमधील प्राध्यापकांनी शोध निबंध लिहून व चर्चा सत्रात सहभागी होऊन पवारांच्या कवितेवर विचार मंथन केले होते.

यापैकी बेचाळीस शोध निबंधाचे संकलन देशमुख महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ जयदेवी पवार
व डॉ.दुष्यंत कटारे यांनी ” आ.य.पवार यांच्या निसर्ग व विज्ञान कविता” या शीर्षकाचे ग्रंथात रूपांतर
केले असून लातूर येथील इनव्हेंशन पब्लिकेशनने हा
ग्रंथ आकर्षक स्वरूपात प्रसिद्ध केला आहे. या ग्रंथाचे प्रकाशन लातूरचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते लातूर येथील व्यंकटराव देशमुख महाविद्यालयाच्या प्रांगणात नुकतेच झाले.

या ग्रंथात २३ शोध निबंध पवारांच्या निसर्ग कवितेवर असून १९ शोध निबंध विज्ञान कवितेवर
आहेत.संपादकीय प्रस्तावना वेधक असून कवितेच्या अभ्यासकांना व एकुणच साहित्य क्षेत्राला हा ग्रंथ मौलिक व दिशा दर्शक ठरेल असा आहे. कवी आ.य.पवार यांच्या कविता नांदेड, नागपूर, अमरावती , मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात समाविष्ट असून त्यांचा ‘ धूळपेर ‘ काव्यसंग्रह कर्नाटक विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात शंभर गुणांचे पेपरला या वर्षीपासून निवडला आहे.त्यांचे सहा काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेले असून दोन प्राध्यापकांनी त्यांच्या कवितेवर
एम फिल पदवी घेतली आहे. आ.य.पवारांची कविता वाड्मयीन गुणवत्तेची असल्याने
त्यांचे कवितेवर तीन समीक्षा ग्रंथ प्रसिद्ध झालेले आहेत.

पवारांच्या दर्जेदार निसर्ग व विज्ञान कवितामुळे नगर जिल्ह्याचे लौकिकात मोठी भर पडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here