जामखेड तालुक्यात मुलीचे अपहरण, गुन्हा दाखल

0
287

जामखेड प्रतिनिधी
                   जामखेड न्युज——

जामखेड तालुक्यात मुलीचे अपहरण, गुन्हा दाखल

जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गवळवाडी येथील फिर्यादीचे राहते घरातुन दि. ९ सप्टेंबर २०२२ रोजी रात्री १२:३० ते १:०० वाजेचे दरम्यान यातील संशयीत गणेश पांडुरंग काळे रा. गवळवाडी याने गवळवाडी येथील फिर्यादी यांची अपहरित मुलगी हिस काहितरी अमिष दाखवुन फुस लावुन पळवुन नेवुन अपहरण केले आहे.

मजकुरचे फिर्यादी वरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे खर्डा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळास कर्जत उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी भेट दिली असून पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here