शेतकऱ्यांचा आधार हरपला, सहकार महर्षी जगन्नाथ राळेभात अनंतात विलीन

0
233

जामखेड न्युज——

 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक सहकार महर्षी जगन्नाथ तात्या राळेभात यांचे बुधवार रोजी सकाळी पुणे येथे रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले. यामुळे श्रद्धांजली अर्पण करताना शेतकऱ्यांचा आधार हरपला अशी भावना व्यक्त केली. आणी सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता. 


तात्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून त्यांचा चाहता वर्ग आला होता. अमरधाम येथे सर्व सोपस्कर पार पडले. तात्यांचा थोरला मुलगा सुधीर दादा राळेभात यांनी मुखाग्नी दिला.यावेळी धाकटा मुलगा जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात व इतर कुटुंबीय नातेवाईकांसह अप्तेष्ठांनी अश्रु नयनांनी तात्यांना अखेरचा निरोप दिला.

 

यावेळी विविध मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

मंत्री आमदार प्रा. राम शिंदे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे, संचालक अंबादास पिसाळ, सभापती प्रशांत गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ प्रमुख प्रा. मधुकर आबा राळेभात,  तात्यांचे मित्र कल्लू चाचा, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले, वंचितचे राज्य समन्वयक अरुण जाधव रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, यशवंत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रवी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाळासाहेब जगताप, काँग्रेसचे नेते प्रवीण घुले, भाजपचे नेते दादासाहेब सोनमाळी, सचिव संघटनेचे नेते नितीन सपकाळ, पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत मोरे माजी सभापती संजय वराट, माजी सभापती तथा विद्यमान सदस्य डॉ. भगवानराव मुरूमकर, उपसभापती रवि सुरवसे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक पांडुरंग काका सोले, अँड.बंकटराव बारवकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजीराजे भोसले ग्रामपंचायतची माजी सदस्य पोपटराव गायतडक, प्राचार्य श्रीकांत होशिंग, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक राम निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रकाश सदाफुले उद्योजक शितल शिंगवी पत्रकार मिठूलाल नवलाखा आदींनी श्रद्धांजली वाहिली आणि तात्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी सर्वानीच सांगितले की, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी तळमळीने काम केले, मुलांनी त्यांचा आदर्श घेऊन काम करावे असे सांगितले. यावेळी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here