जामखेड न्युज——
शहरातील वस्ताद सत्ता ग्रुप आयोजित प्रसिद्ध विनोदी अभिनेता सुभाष यादव प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ पैठणीचा तुफान काॅमेडी कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त नागरीकांनी टेंशन फ्री होण्यासाठी, खळखळून हसण्यासाठी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक वस्ताद सत्ता ग्रुप तर्फे माजी सरपंच कैलास माने यांनी केले आहे.

शहरातील वस्ताद सत्ता ग्रुप तर्फे रविवारी करीना काळे (काळी मैना) यांचा म्हाळसाकांत डिजिटल आॅर्किट्रा कार्यक्रम तपनेश्वर गल्ली येथे संपन्न झाला या कार्यक्रमासाठी तरूण व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. करीना काळे हिने आपल्या कलेने जामखेड करांची मने जिंकली. अनेकांनी तिच्या गाण्यावर ठेका धरला होता.

मंगळवारी दि ६ रोजी तपनेश्वर गल्ली येथील वस्ताद सत्ता ग्रुप तर्फे लाखो लोकांनी पाहिलेला हसुन हसुन पोट दूखवणारा भन्नाट व सुपरहिट काॅमेडीचा बादशहा काॅमेडी चे वादळ प्रसिद्ध विनोदी अभिनेते सुभाष यादव प्रस्तुत काॅमेडी तडाखा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा तुफान काॅमेडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन वस्ताद सत्ता ग्रुप तर्फे माजी सरपंच कैलास माने यांनी केले आहे.

करीना काळे काळी मैना हिच्या बहारदार कार्यक्रमानंतर आता तुफान काॅमेडी अभिनेता सुभाष यादव यांचा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा काॅमेडी तडाखा कार्यक्रम होत आहे.


वस्ताद सत्ता ग्रुप गणेशोत्सव आयोजित सुभाष यादव यांचा काॅमेडी तडाखा खेळ पैठणीचा कार्यक्रम मंगळवारी तपनेश्वर गल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी खळखळून हसण्यासाठी टेंशन फ्री होण्यासाठी कार्यक्रमचा
लाभ घ्यावा असे आवाहन वस्ताद सत्ता ग्रुप तर्फे करण्यात आले आहे.