जामखेड न्युज——
शिक्षक दिनानिमित्त श्री साकेश्वर विद्यालयात सावित्रीच्या लोकिंनी मुलींनी दिवसभर शाळा चालवली शिक्षकांची हुबेहूब भुमिका बजावली प्रत्येक विषयाचा चांगला अभ्यास करून ज्ञानदानाचे कार्य सुरळीत पार पाडले.

श्री साकेश्वर विद्यालयातील राधिका वराट, वैष्णवी कडभने, प्राजक्ता लहाने, तेजस्विनी लहाने, तृप्ती मोहिते, ईश्वरी मुरूमकर, राधा नेमाने, दीपाली वराट, गीता वराट, साक्षी वराट, साक्षी वराट, सानिका वराट तसेच प्रविण घोलप, नितीन वराट, शुभम वराट या विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी भुमिका बजावली

राधिका वराटने मुख्याध्यापकाची भुमिका बजावली यानंतर वैष्णवी कडभने व तृप्ती मोहिते यांनी इंग्रजी विषयाचे अध्यापन केले, प्राजक्ता लहाने व सानिका यांनी इतिहास, मराठी, इंग्रजी, तेजस्विनी लहाने मराठी व विज्ञान, ईश्वरी मुरूमकर विज्ञान, दिपाली वराट गणित, साक्षी वराट सायन्स व गणित तर साक्षी वराट ने चित्रकला व हिंदी , गीता वराट इतिहास व मराठी प्रविण घोलप इंग्रजी, अर्जुन सरोदे मराठी विषयाचे अध्यापन केले.


नितीन वराट व शुभम वराट यांनी सेवकांची भुमिका बजावली.

सकाळी परिपाठ घेण्यापासून ते सर्व तासिकाचे नियोजन सहा तासानंतर कार्यक्रम व शेवटी वंदेमातरम् हे सर्व आजच्या शिक्षकांनी घेतले चांगले नियोजन केले होते.
आजच्या शिक्षकांना मुख्याध्यापक दत्ता काळे, राजकुमार थोरवे, सुदाम वराट, अर्जुन रासकर, महादेव मत्रे, सचिन वराट, अशोक घोलप, त्रिंबक लोळगे, सुलभा लऊळ, विजय हराळे, अतुल दळवी, आण्णा विटकर, आश्रू सरोदेयांनी मार्गदर्शन केले.