गणेशोत्सवानिमित्त वस्ताद सत्ता ग्रुपतर्फे काळी मैना (करीना काळे) यांच्या बहारदार आॅर्किट्राने जिंकली जामखेडकरांची मने

0
235

जामखेड न्युज——

   

गणेशोत्सवानिमित्त वस्ताद सत्ता ग्रुप तर्फे काळी मैना (करीना काळे) यांचा म्हाळसाकांत डिजिटल आॅर्किट्रा कार्यक्रम तपनेश्वर गल्ली येथे संपन्न झाला या कार्यक्रमासाठी तरूण व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. करीना काळे हिने आपल्या कलेने जामखेड करांची मने जिंकली. अनेकांनी तिच्या गाण्यावर ठेका धरला तसेच याच गणेश मंडळातर्फे उद्या मंगळवारी खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. 
  यावेळी उल्हास (वस्ताद) माने आयोजित तपनेश्वर गल्ली येथे अध्यक्ष अनिकेत जाधव, शरद माने, अक्षय शिंदे, कृष्णा शिरोळे, अभिजीत माने, तुषार पवार, बबलू जाधव, राहुल माने, योगेश पवार, महेश येवले, बबलू जाधव यांच्या सह मोठ्या संख्येने युवक व महिला हजर होत्या
  यावेळी वस्ताद सत्ता गृप गणेशोत्सव मंडळाने उल्हास माने वस्ताद यांच्या हस्ते गणपतीची आरती केली यावेळी बोलताना माने म्हणाले की, तीन वर्षांपासून कार्यक्रम बंद होते. वस्ताद सत्ता गृप तर्फे काळी मैना सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. सर्वानी शांततेत कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. 
यावेळी वस्ताद सत्ता गृप चे अध्यक्ष अनिकेत जाधव म्हणाले की, तरूणांच्या आग्रहाखातर काळी मैना सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. तसेच मंगळवारी खेळ पैठणीचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. सर्व युवक व महिलांचे कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या बद्दल आभार मानले. 
  यावेळी म्हाळसाकांत डिजिटल आॅर्किट्राची प्रमुख आकर्षक काळी मैना (करीना काळे) म्हणाली की, आमच्या गृपला सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यासाठी वस्ताद सत्ता गृप गणेश मंडळाने बोलावले निश्चित आम्ही तुमचे मनोरंजन करू मंडळाच्या सर्व सदस्यांचे आभार मानले.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here