जामखेड न्युज——
तालुक्यातील लटकेवस्ती जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षिका अनिता पवार यांना नगर जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. दि. ५ सप्टेंबर रोजी नगर जिल्हा परिषद येथे पुरस्कार वितरण होणार आहे. पवार मॅडमवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अनिता विठ्ठल पवार (पिंपरे) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लटकेवस्ती (शिऊर),केंद्र -नायगाव, ता.जामखेड जि. अहमदनगर येथे सन 2013 पासूनकार्यरत असून त्यावेळी शाळेचा पट 8 होता.सातत्यपूर्ण मार्गदर्शने व सरावाने आज शाळेचा पट 50 आहे.शाळेमध्ये दरवर्षी 100%मुले शिष्यवृत्ती परीक्षेला बसवली जातात व सलग 4 वर्ष शाळेचा शिष्यवृत्ती निकाल 100% असून 3 मुलांची राज्य गुणवत्ता यादीत तर 24 मुलांची जिल्हा गुणवत्ता यादीत निवड झाली आहे.

सलग पाच वर्ष नवोदय साठी सहा मुलांची निवड झाली, एका विद्यार्थ्यांची ज्ञान प्रबोधिनी प्रशाला पुणे या ठिकाणी निवड झाली.
दरवर्षी विविध स्पर्धा परीक्षेला शाळेतली मुले बसवली जातात. आतापर्यंत दरवर्षी शाळेतील अनेक विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादी चमकली आहेत. शाळेमध्ये विविध स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती, नवोदय या परीक्षांचे मार्गदर्शन सातत्याने केले जाते. शाळेचा निकाल दरवर्षी 100% लागतो. शालेय परिसरामध्ये वृक्ष संवर्धन केलेले असून शालेय परिसर हिरवागार आहे.तसेच आतापर्यंत एक लाख 18 हजार एवढा लोकसहभाग जमा करून शाळेसाठी पिण्याचे पाण्याची सोय करण्यात आली.


लोकसहभागातून संगणक, एलईडी,साऊंड सिस्टिम इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच लोकसहभागातून शालेय रंगरंगोटी व वृक्ष संवर्धनासाठी निधी उपलब्ध केला. बंद पडू लागलेली शाळा पुन्हा एकदा नवीन जोमाने सुरू झाली. या विविध उपक्रमामुळे श्रीमती अनिता विठ्ठल पवार(पिंपरे)उपा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लटकेवस्ती यांना यावर्षीचा सन 2022 चा जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे त्याबद्दल त्यांचे पुणे महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी पोपट काळे, बीड माध्यमिक शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे , केंद्रप्रमुख किसनराव वराट, मुकुंद सातपुते, घोडके सर, कुमटकर सर, कुंभार सर, त्र्यंबके सर, राऊत सर , मल्हारी पारखे, एकनाथ चव्हाण, शिऊरचे सरपंच हनुमंत उतेकर सह जामखेड तालुक्यातील सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी अभिनंदन केले.