जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज——
जामखेड तालुक्यातील जमदारवाडी येथील केशव पोपट राळेभात वय वर्षे तीस यांनी नापिकी व डोक्यावर कर्जाचा असलेला डोंगर याला कंटाळून जमदारवाडी येथील रहात्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे.
कोरोना काळात केशवचे वडील पोपट राळेभात हे मयत झाले होते कोरोना उपचारासाठी केशव यांने सोसायटी बँकेचे व काही उसनवारी स्वरूपात पैसे घेतले होते व वडीलांनवर उपचार केले परंतु त्यातच त्याच्या वडीलांचे निधन झाले या वर्षी शेतीच्या उत्पन्नावर काही प्रमाणात कर्जाची परतफेड करता येईल या आशेवर शेती केली परंतु या वर्षी उडीद व इतर पीक वाया गेले आहे या विवंचनेतुन त्याने आपली जीवन यात्रा संपवली आहे.
या बाबत जामखेड पोलीसांन कडुन पंचनामा करून शवविच्छेदन केले व रात्री नऊ वाजता जमदारवाडी येथे केशववर अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रहारच्या वतीने या शेतकर्यांच्या कुंटुबाला शासनाने मदत करावी या तहसीलदार योगेश चंद्रे यांना विनंती केली आहे त्या बाबतीत तहसीलदार योगेश चंद्रे यांनी तलाठी यांना पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या आहेत या युवा शेतकऱ्याच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे त्याच्या पाठिमागे पत्नी, दोन मुले, आई असा परिवार आहे घरातील दोन्ही कर्ते पुरूष गेल्या मुळे हे कुटुंब उघड्यावर आले आहे या बाबत शासनाच्या मदतीच्या आशेवरच या कुटुंबाची भिस्त आहे