जामखेड न्युज——
जामखेड पासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या देवदैठण येथील धारदरा या डोंगरात निसर्गाच्या सानिध्यात भूईदरा हा निसर्गाचा अदभुत चमत्कार पाहायला मिळतो. डोंगरात पन्नास ते साठ फूट लांब भुयार असुन आत महादेवाची पिंड आहे. तिथपर्यंत जाता येते परत आत लहान लहान तीन भुयारे आहेत पण जाता येत नाही. निसर्गाच्या सानिध्यातील एक नयनरम्य ठिकाण पर्यटकांना खुणावत आहे.

श्रावण महिन्यामुळे डोंगररांगा हिरवाईने नटलेल्या आहेत. जवळच धारदरा येथे मिनी रामेश्वर धबधबा आहे. तसेच येथील भुयार खुप पुरातन असून येथे काही ऋषी मुनी यांनी येथे तपश्चर्या केली असेही सांगितले जाते. अनेक ठिकाणाहून लोक हे भुयार पाहण्यासाठी येतात सहलीही येतात.


सध्या या ठिकाणी हभप कैलास महाराज भोरे यांचे वास्तव्य आहे त्यांनी परिसराची चांगली स्वच्छता करून चांगले पटांगण तयार केले आहे. तसेच सध्या या ठिकाणी पत्र्याचा सभामंडप आहे. भोरे महाराज यांच्या बरोबर
बबन उगले, ज्ञानदेव उगले गुरूजी हे पण या ठिकाणी असतात. येथे अनेक दुर्मिळ प्राण्यांचे दर्शन होते. हरणे, ससे, रानडुक्करे, कोल्हे, लांडगे, खोकड, सरपटणारे घोरपड, सापही दिसतात.

श्रावण महिन्यात येथे अखंड हरिनाम सप्ताह असतो. या ठिकाणी खुप लांब लांबून लोक येतात. या ठिकाणाच्या जवळपास देवदैठण वरून दुचाकी व चारचाकी गाडी जाते पण नंतर वर चढण अवघड आहे. रस्ता होणे गरजेचे आहे.
तसेच चांगले मंदिर बांधकाम झाले कि आणखी पर्यटकांचा ओढा वाढेल. आमदार रोहित पवारांनी या ठिकाणाला भेट दिली तसेच या ठिकाणी सोलर लाईट व्यवस्था केली आहे. रस्ताही करण्याचे आश्वासन दिले आहे.
पुरातन कथेनुसार असे सांगितले जाते कि या भुयारातील तीन मार्ग एक पंढरपूर, एक तुळजापूर तर एक राक्षसभुवन येथे निघतो. महादेवाच्या पिंडीपर्यत जाता येते पुढे जाता येत नाही. आत पाणी टिपकते, कोंदट वातावरण निर्माण झालेले आहे. आत मोठमोठ्या पाकुळ्या आहेत. आगोदर तर वटवाघूळ पण असायचे. आता जाताना बॅटरी बरोबर असणे आवश्यक आहे. तरच दिसते अन्यथा काही दिसत नाही.

श्री साकेश्वर विद्यालयाची शैक्षणिक सहल या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. सर्व विद्यार्थ्यांनी परिसराची पाहणी करत भुयार कसे आहे हे पाहिले. या ठिकाणी वनभोजनाचा आनंद घेतला. नंतर परिसराची स्वच्छता केली यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात सातवीतील लक्ष्मी वराट, प्रणिती मुरूमकर, अक्षरा नेमाने, समृद्धी वराट, विजया मुरूमकर, दिक्षा वराट, तनुजा वराट, सानिका वराट, ईश्वरी सानप, अंतरा मुरूमकर,
यांच्या सह इतर मुलींनी सुंदर कार्यक्रम सादर केले. ओम वराट, प्रिया वराट, सिद्धी मुरूमकर, प्रियंका डोके, संध्या घोडेस्वार, ऋतुजा पुलवळे या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला.
यावेळी मुख्याध्यापक दत्ता काळे, राजकुमार थोरवे, सुदाम वराट, अर्जुन रासकर, महादेव मत्रे, अशोक घोलप, त्रिंबक लोळगे, सचिन वराट, अतुल दळवी, अण्णा विटकर, आश्रू सरोदे यांच्या सह सर्व विद्यार्थी हजर होते.
येताना गोसाईबाबा येथे दर्शन घेत विद्यार्थी व शिक्षकांनी कबड्डीचा आनंद लुटला.









