जामखेड न्युज—–
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वागीण विकासासाठी प्रसिद्ध असलेल्या शहरातील शिवाजीनगर येथील विद्याभारती क्लासेसमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रांगोळी, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.

जामखेड शहरातील शिवाजीनगर येथील विद्याभारती क्लासेस विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वागीण विकासासाठी प्रसिद्ध आहे. क्लासेसमध्ये तिसरी चौथी मंथन, पाचवी शिष्यवृत्ती व नवोदय, सहावी, सातवी मंथन तसेच गणित, विज्ञान व इंग्रजी, आठवी एनएसएमएस, शिष्यवृत्ती तसेच इंग्रजी व्याकरण, नववी इंग्रजी व महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा, दहावी इंग्रजी व नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षेसाठी विद्याभारती क्लासेस प्रसिद्ध आहे.

विद्याभारती क्लासेसच्या अनेक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती, नवोदय तसेच, महाराष्ट्र टॅलेंट सर्च तसेच नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे.

शैक्षणिक विकासाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा म्हणून क्लासेसच्या संचालिका जाधव यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्लासेसमध्ये रांगोळी, चित्रकला वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या होत्या यातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी बक्षिसे देण्यात आली स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.