जामखेड न्युज——
पुणे अहमदनगर (Pune Ahmednagar Highway) महामार्गावरील रांजणगाव एमआयडीसी परिसरात मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. चुकीच्या दिशेने आलेल्या ट्रकने भरधाव वेगातील कारला समोरासमोर धडक दिल्याने कारमधील पाच जणांचा मृत्यू झाला. मयत व्यक्ती हे एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर येत आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.

संजय भाऊसाहेब म्हस्के (वय 53), राम भाऊसाहेब म्हस्के (वय 45), विशाल संजय म्हस्के (वय 16), राजू राम मस्के आणि हर्षदा राम मस्के (वय 4) साधना राम मस्के (वय 35) अशी मृत्यू मुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर एक जण गंभीर जखमी आहेत. हे सर्वजण शेवगाव तालुक्यातील आवने बुद्रुक गावचे रहिवासी आहेत. सर्वजण पनवेलच्या दिशेने निघाले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास मस्के कुटुंबीय पुणे अहमदनगर महामार्गाने जात होते. संजय मस्के हे इको कार चालवत होते. दरम्यान रांजणगाव एमआयडीसीतील एलजी कंपनी समोर चुकीच्या दिशेने येणाऱ्या एका कंटेनरने त्यांच्या कारला जोराची धडक दिली. धडक दिल्यानंतर कंटेनर चालक मात्र घटनास्थळावरून पळून गेला.

दरम्यान घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या मस्के कुटुंब यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र जखमी पैकी पाच जणांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी कंटेनर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.