जामखेड न्युज——

आपल्या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी जो त्याग केलेला आहे त्याचे प्रतिक म्हणजे आपला तिरंगा आहे. तिरंगा ध्वजाकडे पाहुन आपल्याला आपल्या देशाच्या विकासाची पताका सर्वाना खांद्यावर घ्यावयाची आहे. कर्जत – जामखेडच्या विकासासाठी मी तुमच्या बरोबर आहे असे आमदार रोहित पवार यांनी सर्वात मोठा तिरंगा ध्वजारोहण केल्यानंतर बोलताना व्यक्त केले.

आमदार रोहित पवारांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जामखेडच्या नवीन नगरपरिषद कार्यालयासमोर सर्वात मोठा तिरंगा ध्वज वीर माता तसेच सर्वच प्रशासकीय अधिकारी यांच्या हस्ते फडकविला यावेळी आमदार रोहित पवार बोलत होते.

यावेळी आमदार रोहित पवार, डॉ. शोभा आरोळे यांच्या सह सर्व प्रशासकीय अधिकारी तहसीलदार योगेश चंद्रे, न्यायाधीश जगताप साहेब, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते, महिला बाल विकास अधिकारी ज्योती बेल्हेकर, बांधकाम विभागाचे अभियंता संजय कांबळे, कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, अशोक शेळके, वैद्यकीय अधिक्षक संजय वाघ, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, महावितरणचे अभियंता गावीत, कदम, कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दत्तात्रय वारे, पंचायत समितीचे माजी सभापती सुर्यकांत मोरे, रमेश आजबे, संजय वराट, प्रविण उगले, सुरेश भोसले, राजेंद्र पवार, मंगेश आजबे, अभय शिंगवी, शहाजी राळेभात, संभाजी राळेभात, अनिल देडे, मयुर भोसले, निलेश बोरा, संग्राम पोले, शोभा भोसले, पुजा राळेभात, बाळासाहेब काळे, लक्ष्मण भोरे, हर्षल डोके, अमित जाधव, प्रकाश काळे, अनिल बाबर, उमर कुरेशी, डॉ. कल्याण काशीद, जयसिंग उगले, खलील मौलाना, दिपक पाटील, चंद्रकांत राळेभात, महेश राळेभात, अमोल गिरमे, किसनराव ढवळे, डॉक्टर असोसिएशन, वकिल असोसिएशन, पत्रकार संघटना, यांच्या सह एनसीसी कॅडेट, ल. ना. होशिंग विद्यालय, नागेश विद्यालय, कन्या विद्यालय येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, आपण स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत शेती, शिक्षण, आरोग्य, रस्ते या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे. याच प्रगतीचे लक्षण म्हणजे आज मुलींचा जन्मदर वाढला आहे. आपण सर्व देशवासीय जात धर्म, पंथ विसरून देशाच्या विकासासाठी एकत्र काम करत आहोत. सर्वाच्या सहकार्याने आपण प्रगतीपथावर आहोत.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सरसमकर व शिवगंगा मत्रे तर आभार प्रा. मधुकर राळेभात यांनी मानले
चौकट
गेल्या वर्षी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर खर्डा शिवपट्टन किल्ल्यासमोर सर्वांत मोठा भगवा ध्वज उभारला होता आता नगरपरिषद कार्यालयासमोर सर्वात मोठा तिरंगा ध्वज उभारला आहे यातुन आपण पूर्वजांचा त्याग तेवत ठेवून हा विकासाचा ध्वज आहे असे समजून विकासासाठी सर्व प्रयत्न करणार आहोत.
चौकट
आज ज्या ठिकाणी सर्वात मोठा तिरंगा ध्वज फडकविला त्या ठिकाणी एके काळी मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य होते शहराचा कचरा टाकला जात होता. आता या ठिकाणी आमदार रोहित पवारांनी नगरपरिषद कार्यालय, नाना नानी पार्क, अभ्यासिका उभारण्याचे काम सुरू आहे. तसेच जामखेडचे ग्रामदैवत नागेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी नदीच्या दोन्ही बाजूंनी रस्ते फुटपाथ बनवले आहेत. सुंदर असा परिवार बनविला आहे.