जामखेड न्युज——

माझ्याकडे काय बघतो असे म्हणून एका युवकास चाकूचा धाक दाखवून मोटारसायकलवर बसवून घेऊन जातात व त्यास ५० हजार रुपये न दिल्यास पिस्तूलने गोळ्या घालून मारण्याची धमकी देतात अशी फिर्याद एका युवकाने दाखल केल्यावरून पोलीसांनी तीन जणावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक केली आहे.

याबाबत जामखेड पोलीसात कृष्णा राम खोटे (वय २२, रा. मोरे वस्ती, जामखेड याने फिर्याद दिली की, शुक्रवार दि. १२ रोजी सायंकाळी पाच वाजता शहरातील मोरे वस्ती येथे घरी जात असताना नितीन रोहीदास डोकडे उर्फ बिल्ला व त्याचा मित्र अक्षय विजय धोत्रे दोघे (रा. मिलिंदनगर, जामखेड) मोटारसायकलवरून आले व म्हणाले, माझ्याकडे का बघतो असे म्हणून चाकूचा धाक दाखवून त्यांच्या मोटार सायकलवर मध्यभागी बळजबरीने बसवून बैलबाजार येथे घेऊन गेले तेथे गेल्यावर नितीन डोकडे उर्फ बिल्ला याने लाथा बुक्क्यांनी मारहाण केली

अक्षय धोत्रे तेथून निघून गेला व त्यानंतर नितीन डोकडे याचा दुसरा मित्र कुणाल पवार हा तिथे स्कुटी दुचाकी घेऊन आला. व मला ते दोघे स्कुटीवर बसवून जांबवाडी येथील तलावा वर घेऊन गेले व आत्ताच्या आत्ता ५० हजार रुपये मागवून घे नाहीतर तुला पिस्तूलने उडवून टाकू असे म्हणाले. त्यावेळी त्यांना आत्ता पैसे नाहीत घरी चला तेथे देतो म्हणालो असता त्यांनी घरी आणले.

घरी पैसे देण्यास वेळ लागल्याने त्या दोघांनी मला व वडीलांना घाण घाण शिवीगाळ करून पैसे नाही दिले तर जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी मी व वडीलांनी आरडाओरडा केल्यानंतर नितीन डोकडे व कुणाल पवार पळून गेले.

कृष्णा पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी नितीन रोहीदास डोकडे, धोत्रे यांच्यावर भादवी कलम ३८४, ३६३, ३२३, अन्वये गुन्हा दाखल केला. यातील मुख्य आरोपी नितीन डोकडे उर्फ बिल्ला यास पोलिसांनी रविवारी अटक केली आहे.