जामखेड न्युज——
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत श्री साकेश्वर विद्यालयात झाडांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आला यावेळी झाडांचे रक्षण करण्याची शपथ घेतली.
साकत येथील श्री साकेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांनी झाडांना राखी बांधून रक्षाबंधन कार्यक्रम साजरा केला. यावेळी विद्यार्थीनींनी सांगितले की, आमचे रक्षण करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. आमच्या रक्षणाबरोबरच झाडांचे रक्षण करू अशी शपथ विद्यार्थ्यांनी घेतली.
कोरोना काळात प्रत्येकाला आक्सीजनचे महत्त्व कळले आहे. आक्सीजन साठी मोठा आटापिटा करावा लागला होता. एक झाड कोट्यावधी रूपयांचा आक्सीजन देते पण ते फुकट मिळतो म्हणून आपल्याला महत्त्व लक्षात येत नाही त्यामुळे झाडे लावा झाडे जगवा असे आवाहन करण्यात आले.
झाडे आपल्याला संरक्षण आणि प्राणवायू (ऑक्सिजन) देतात, आपले नैसर्गिक पोषण करतात. त्यामुळे झाडांना राखी बांधून ‘रक्षाबंधन’ साजरा केल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त
‘हर घर तिरंगा’च्या धर्तीवर ‘हर वृक्षपर तिरंगा’ हा नारा देत विद्यार्थ्यांनी झाडांवर झेंडाही उभारला.