हर घर तिरंगा या राष्ट्रीय कार्यक्रमात स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे -अमित चिंतामणी त्यांच्या तर्फे सातशे कुटुंबीयांना मोफत झेंडे वाटप

0
204
जामखेड प्रतिनिधी 
            जामखेड न्युज—–
       देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५  व्या वर्धापनदिनानिमित्त “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” साजरा करताना देशाच्या प्रत्येक नागरिकाने घरी तिरंगा लावण्यासाठी आणि तो फडकवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या “हर घर तिरंगा” अभियानांतर्गत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील कोट्यवधींहून अधिक घरांवर तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर जामखेड नगरपरिषदेचे कार्यकुशल नगरसेवक नगरसेवक अमित चिंतामणी मित्र परिवाराच्या वतीने जामखेड शहरातील ७०० घरांना ” हर घर तिरंगा वाटप ‘ करण्यात आले.
      नगरसेवक अमित चिंतामणी हे सामाजिक व राष्ट्रीय कार्यक्रमात नेहमीच आघाडीवर असतात हर घर तिरंगा या राष्ट्रीय कार्यक्रमात त्यांनी सुमारे सातशे कुटुंबीयांना मोफत झेंडे वाटप केले आहेत. तसेच सर्वानी राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन शहरवासीयांना केले आहे. 
   यावेळी  बोलताना नगरसेवक अमित चिंतामणी म्हणाले की, तिरंगा म्हणजे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रतीक आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात राष्ट्रध्वजाचा मान व सन्मान राखून  हर घर तिरंगा या देशव्यापी अभियानात सहभागी होऊया ! तिरंग्याखाली एकत्र येऊया ! नागरिकांनी “हर घर तिरंगा” उपक्रमात स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे. राष्ट्रध्वजाचा आपमान होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी . १३ ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान घरोघरी तिरंगा ध्वज फडकवून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सहभागी होऊया ! तसेच १५ तारखेला संध्याकाळी हा राष्ट्रध्वज सन्मानाने उतरावयाचा आहे. 
     यावेळी प्रभागातील छत्रपती शिवाजी महाराज पेठ, मोगलपूरा, कोर्ट रोड, जाधव गल्ली, देशमुख गढी, सिद्धार्थ नगर, साठे नगर, काझी गल्ली, सय्यद नगर, सोनार गल्ली, जयहिंद चौक, खर्डा चौक आदी भागामध्ये घरोघरी जावून तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले.
    नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here