जामखेड न्युज——
दोन वर्षांच्या कोरोना Lock Down नंतर जामखेड शहरात ग्रामदैवत श्री नागेश्वर यात्रेनिमित्त नागेश विद्यालयाजवळील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोरील मैदानावर आनंदनगरी मध्ये आकाशी पाळणे, ब्रेक डान्स, मौत का कुआ, टोरा टोरा, रेल्वे, बोट, लहान मुलांचे विविध करमणूकीची साधने अशा आनंदनगरीचा मेळा भरला आहे त्याचा तिकीट दर अत्यंत माफक दरात म्हणजे फक्त तीस रुपये ठेवण्यात आला आहे तरी नागरिकांनी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन आयोजक संपत राळेभात व राम पवार यांनी केले आहे.

दोन वर्षांच्या कालखंडानंतर जामखेड मध्ये नागेश्वर यात्रेनिमित्त येणाऱ्या भावीक भक्तांच्या आनंदासाठी आनंदनगरीचे आयोजन करण्यात येते यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक पाहण्यासाठी येतात. संपत राळेभात व राम पवार यांनी आनंदनगरीचे आयोजन केले आहे आणि तिकीट दरही अत्यंत कमी म्हणजे फक्त तीस रुपये ठेवण्यात आले आहेत तेव्हा या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच येणाऱ्या भाविक भक्तांना नागपंचमी निमित्ताने संपत राळेभात व राम पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत ना नफा ना तोटा तत्वावर असणाऱ्या आनंद नगरीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
,



