जामखेड न्युज——
प्रवरानगर लोणी येथील बीसीएस कॉलेज मधील तृतीय वर्षाचे विद्यार्थी रवि वराट, ऋषि मगर व अभि हारदे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च न करता कसलाही डामडोल न करता आपला वाढदिवस अनाथाश्रमातील मुलांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करून साजरा केला.
रवि वराट, ऋषि मगर व अभि हारदे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त गंगाधर बाबा छात्रालय (अनाथाश्रम)गुहा ,ता.राहुरी येथे भेट देऊन वाढदिवस साजरा केला व जीवनावश्यक वस्तु वाटप केले. अशा प्रकारे वाढदिवस साजरा केल्यामुळे अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.









