[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
जामखेड न्युज——
जामखेड तालुक्यातील पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाले असून अनेकांच्या अपेक्षा प्रमाणे आरक्षण निघाले आहे तर काहीचा हिरमोड झाला आहे यामुळे कई खुशी कई गम निर्माण झाले आहे.

जामखेड तालुक्यात तीन जिल्हा परिषद गट तर सहा पंचायत समिती गण आहेत. पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक २०२२ सर्व प्रवर्गाचा तक्ता पुढील प्रमाणे आहे.

साकत गण सर्वसाधारण
शिऊर गण अनुसूचित जाती स्त्री
जवळा गण नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
अरणगाव गण सर्वसाधारण
खर्डा गण सर्वसाधारण
नान्नज सर्वसाधारण स्त्री

निवडणूकासंदर्भात सुप्रीम कोर्टाने आरक्षणाबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत .

सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाबाबत मोठे निर्देश दिले आहेत. ओबीसी आरक्षणास मंजुरी देण्याआधी जाहीर झालेल्या 365 जागांवरील निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. या निवडणुकांसाठी कोणत्याही प्रकारची नवीन अधिसूचना जारी करता येणार नसल्याचे ही सुप्रीम कोर्टाने म्हटले. नव्याने निवडणुका जाहीर केल्यास कोर्टाचा अवमान होईल आसे देखील कोर्टाने म्हंटले आहे.





