पाणंद रस्त्याचे काम न होताच बीले काढली दोषींवर योग्य ती कारवाई करावी म्हणून महादेव वराट यांचे उपोषण तहसीलदार यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे

0
217
जामखेड प्रतिनिधी 
साकत येथिल पानंद रस्ते योजने अंतर्गत मंजूर आसलेल्या पानंद रस्त्याचे बोगस बीले काढण्यात आली आहेत. जे रस्ते झाले आहेत त्या रस्त्यांची बीले न काढता न केलेल्या पानंद रस्त्याची बीले काढण्यात आली आसल्याचा आरोप करत साकत येथिल ग्रा. सदस्य महादेव लक्ष्मण वराट यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. या वेळी तहसीलदार यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर सदरचे उपोषण मागे घेण्यात आले. 
साकत येथिल मातोश्री ग्राम समृद्धी शेत पानंद रस्ते योजने अंतर्गत १० ते १२ पाणंद रस्ते मंजुर होते. या ठीकाणी काही रस्त्यांचे कामे झाली आसुन ती चांगली झाली आहेत का? याची पाहणी करावी. रस्त्याच्या लांबीचे मोजमाप करुन जेवढे काम झाले आहे तेव्हढेच बीले अदा करण्यात यावीत या बाबत उपोषण कर्ते महादेव लक्ष्मण वराट यांनी दि १७ /६/२०२२  रोजी प्रशासनाला अर्ज दिला होता. तरी देखील पाणंद रस्त्याचे काम झाले आहे त्यांचे बीले अदा न करता साकत स्मशानभुमी ते पिंपळवाडी या रस्त्याचे काम झाले नाही तरी देखील या कामाचे बोगस बील काढण्यात आले आहे. तसेच ज्या रस्त्यांची कामे झाली नाहीत त्या रस्त्यांची बीले काढली आसल्याने साकत परीसरातील सर्व पाणंद रस्त्याची चौकशी करावी अशी मागणी उपोषणा दरम्यान महादेव लक्ष्मण वराट यांनी केली होती. या उपोषणास तालुक्यातील सर्व भाजपच्या पदाधिकार्‍यांनी पाठींबा दिला होता. 
यानंतर तहसीलदार योगेश चंद्रे व गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी उपोषण स्थळी भेट दिली होती. तहसीलदार योगेश चंद्रे यांनी लेखी आश्वासन देऊनही संबंधित रस्त्यांची चौकशी करून जर कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सदरचे उपोषण मागे घेण्यात आले. 
उपोषणा दरम्यान भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवी सुरवसे, भाजपा तालुका अध्यक्ष अजय दादा काशिद, उपोषणकर्ते ग्रामपंचायत सदस्य महादेव लक्ष्मण वराट, माजी सरपंच कांतीलाल वराट, उपसरपंच राजाभाऊ वराट, विठ्ठल वराट, युवा मोर्चाचे ता. अध्यक्ष शरद कार्ले, अजित वराट, विजय वराट, शिऊर चे माजी ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब माने, गणेश आडसूळ, अभिजित वराट, विशाल नेमाने, अजय नेमाने, विजय घोलप, सुनिल भापकर, बाजीराव गोपाळघरे, नानासाहेब गोपाळघरे, बाळासाहेब गोपाळघरे, भास्कर गोपाळघरे, सुरज काळे, आप्पा ढगे, बाळासाहेब वराट, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here