मानवी जीवन हे खूप मूल्यवान आहे ,सुंदर आहे, मानवी जीवन हे जगण्यासाठी आहे, जीवन खुप सुंदर आहे, गोड आहे, अमृतासमान मधुर आहे ,जीवन एक कसोटी आहे, जीवन ऊन सावलीचा खेळ आहे, जीवन एक अनुभव आहे, जीवन जगण्यासाठीच आहे फक्त जगण्यासाठी! जीवनात सुख आहे सुख मानले पाहिजे. जीवनात दुःख आहे ते विसरले पाहिजे, जीवनात संकटे आहेत त्यावर मात करता आली पाहिजे, जीवन हे मानलं तर सुंदर गुलाबाच्या फुलाप्रमाणे आहे नाही तर काटेरी बाभळी सारखे बोचणारे काटे आहेत. जीवन सुंदर करण्यासाठी नियोजन करा. वाचन अविरत चालू ठेवा. मुलांची ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात करिअर करू द्या असे मत शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी व्यक्त केले
साकत केंद्रातील शिक्षण परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून
बीडचे माध्यमिक शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष तय्यब शेख, होते यावेळी केंद्रप्रमुख मल्हारी पारखे, संदीप ओझा, सुदाम वराट, सुभाष मोहारे, भगवान समुद्र, महादेव मत्रे, राजकुमार थोरवे, नागरगोजे सर, गर्जे सर, तारामती मोटे, चंद्रकला शिंदे, संध्या खंडागळे, अशोक घोलप, अर्जुन घोलप, त्रिंबक लोळगे, गणेश देवकाते यांच्या सह केंद्रातील सर्व शिक्षक व शिक्षिका हजर होत्या.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, सध्या अनेक पालक मुलांची आवड निवड न पाहता आपल्या मुलांने डॉक्टर, इंजिनिअर झाले पाहिजे या मागे लागले आहेत. पण हे बरोबर नाही. मुलांचा कल पाहून ज्या क्षेत्रात आवड त्या क्षेत्रात करिअर करून द्यावे. मुलांवर दडपण आणू नये
प्रत्येक मुलाला स्वतंत्र पद्धतीने शिकवले पाहिजे तरच जगण्याचा खरा आनंद मिळणार आहे. असे अनमोल मार्गदर्शन शिक्षण परिषदेत केले.
शिक्षण परिषदेत प्रस्तावना केंद्रप्रमुख मल्हारी पारखे, निपुण भारत भाषा बी.व्हि कावळे, गणित महादेव मत्रे, सामाजिक शास्त्र राजकुमार थोरवे, केंद्रस्तरावर निश्चित करण्यात आलेल्या विषयांवर चर्चा संदीप ओझा, नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सादरीकरण वैशाली गुंजेगावकर,
पुस्तक परिचय ज्ञानोबा राठोड, प्रशासकीय विषय चर्चा व मार्गदर्शन केंद्रप्रमुख मल्हारी पारखे, सुत्रसंचालन भगवान समुद्र तर आभार रजनीकांत साखरे यांनी मार्गदर्शन केले व शिक्षण परिषदेची सांगता झाली.