माहेरी गेलेली बायको परत येत नाही म्हणून नवरा चढला मोबाईल टॉवरवर!!

0
226
जामखेड न्युज——
माहेरी गेलेल्या पत्नीला परत आणा या मागणीसाठी एका
तरुणाने दारूच्या नशेत चक्क मोबाईल टॉवरवर चढून 4 तास ठिय्या दिला आहे. जालन्यातील बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथे ही घटना घडली आहे. गणपत बकाल असे या तरुणाचे नाव आहे.
दारूच्या नशेत गणपत बकाल हा बुधवारी दुपारी चारच्या
सुमारास गावातीलच मोबाईल टॉवरवर चढला. गावातील
लोकांना त्याने मला घरकुल पाहिजे. माहेरी गेलेल्या बायकोला मला परत आणायचे आहे असे सांगितले. यावेळी पोलीस त्याला समजवण्यासाठी आले. मात्र पोलिसांकडूनही तो खाली आला नाही. त्यानंतर मात्र अग्नीशमन दलाचे पथक मागविण्यात आले मात्र तेही हतबल झाले. तब्बल 4 तासाने तो स्वत: टॉवरवरून खाली उतरला. त्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here