जामखेड न्युज——
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी रात्री उशिरा राजधानी नवी दिल्लीत दाखल झाले. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. अशातच, शिंदे गट आता शिवसेना भवनावरही राज्य करणार असल्याच्या चर्चेला उधाण आल आहे. दरम्यान मध्यरात्री दिल्लीत दाखल झालेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्ली दौऱ्यामागचे कारण स्पष्ट केलं आहे.

‘ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी मी दिल्लीत आलो आहे.’ असे कारण त्यांनी मध्यरात्री माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. (OBC Reservation)महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास दिल्लीत दाखल झाले. दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
काय म्हणाले CM शिंदे? महाराष्ट्र सरकार ओबीसींना न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे. राज्याच्या दृष्टीकोनातून ते महत्त्वाचे आहे. आम्ही ओबीसी आरक्षण खटल्याच्या तयारीबाबत वकिलांशी चर्चा केली. ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी मी दिल्लीत आलो आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात आज होणारी सुनावणी बुधवारी 20 जुलै रोजी होणार आहे.
हेही वाचा: एकनाथ शिंदे गटाची नवी कार्यकारिणी
तसेच यावेळी त्यांनी खासदारांबाबतही मोठं विधान केलं. शिवसेनेचे खासदारही पक्षाविरोधात भूमिका घेणार असल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे फक्त 14 नव्हे तर 18 खासदार आपलेच आहेत. सर्वजण येणार असून आपण त्यांची भेट घेणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सध्या खुप चर्चा सुरु आहे पण मला अद्याप काही माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले. खासदारांसोबत भेट झाल्यानंतर अधिक माहिती देऊ असेही त्यांनी सांगितले. लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. आमच्याकडे बहुमत असून सुप्रीम कोर्टात आमच्या बाजूने निकाल येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.