अतिवृष्टीमुळे राज्यातील 8 हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

0
212
जामखेड न्युज——
 राज्यातील बहुतांश भागामध्ये मुसळधार पाऊस सुरु होत आहे. या पावसामुळे आतापर्यंत 89 लोकांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे होणारे नुकसान चालू राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.राज्यातील 8 हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 नगरपालिका (Municipal Councils) आणि नागरपंचायतींच्या (Nagar Panchayat) निवडणूका स्थगित झाल्यानंतर आता राज्यातील 8 हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका (Co-Operative Society Elections) पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे (Maharashtra Heavy Rainfall) निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्य सरकारच्या (Maharashtra Government)  निर्णयानंतर आता या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारने आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार, राज्यातील बहुतांश भागामध्ये मुसळधार पाऊस सुरु होत आहे. या पावसामुळे आतापर्यंत 89 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील अतिवृष्टीमुळे 249 गावं बाधित झाली आहेत. अनेक भागामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे होणारे नुकसान चालू राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील 8 हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, याआधी राज्यातील 92 नगर परिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) घेतला. सुप्रीम कोर्टात (supreme court) ओबीसी आरक्षणाबाबत (OBC reservation) सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतला. अतिवृष्टी आणि इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण या मुद्द्यांवरुन ही निवडणूक लांबणीवर टाकण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि इतर राजकीय पक्षांनी विनंती निवडणूक आयोगाकडे केली होती. या विनंतीनंतर निवडणूक आयोगाने या निवडणुका स्थगित करण्याची घोषणा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here