जामखेड न्युज——
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वस्तीगृहात मिळणार्या सुसंधीचा विद्यार्थ्यांची लाभ घेऊन अंगी जिद्द, चिकाटी व मेहनत घेत चांगले अधिकारी बना असे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सांगितले.

गुरूप्रौर्णिमेनिमित्त तहसीलदार योगेश चंद्रे यांचा वसतीगृहातील शिक्षक व विद्यार्थी यांनी त्यांचा सन्मान केला तहसीलदार चंद्रे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या
यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहपाल अनिल गर्जे, मधुकर महानुर आदर्श विद्यार्थी अभिषेक देशमाने उपस्थित होते.

समाजकल्याण आयुक्त राधाकिसन देवडे यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहाचे काम उत्कृष्टपणे सुरू आहे. सध्या वसतीगृहात ५५ विद्यार्थी आहेत आणखी वीस विद्यार्थी येणार आहेत. तसेच वसतीगृहातील अभिषेक देशमाने हा बी. के. शिंदे कॉलेज मधील आदर्श विद्यार्थी किताब पटकावला आहे. त्यामुळे वसतीगृहात विद्यार्थ्यांना योग्य संस्कार केले जातात.
यावेळी बोलताना तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले की, शासनाकडून मिळणार्या सेवा सुविधांचा लाभ घ्यावा जीवनात मोठे ध्येय ठेवा यश हमखास मिळणारच असेही सांगितले.