जामखेड न्युज——
सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे या स्पर्धेत विद्यार्थी टिकण्यासाठी त्यांचा सर्वागीण विकास होणे आवश्यक आहे. आणी या सर्वागीण विकासासाठी रयतचा गुरूकुल प्रकल्प महत्त्वाचा आहे असे मत प्राचार्य बी. के. मडके यांनी व्यक्त केले.
येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालया मध्ये रयत चा गुरुकुल प्रकल्प निमित्त पालक व शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न झाला. डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली विद्यालयाचे वतीने सुदाम वराट यांची जामखेड मीडिया क्लबच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला

प्रमुख उपस्थिती प्राचार्य मडके बी के, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक यादव ,उपाध्यक्ष अमोल बहिर ,शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष नानासाहेब मोरे,सौ शारदा वराट ,अजय अवसरे,ज्येष्ठ शिक्षक रघुनाथ मोहळकर,संजय हजारे ,रमेश बोलभट,गुरुकुल प्रमुख संतोष ससाने, सोमीनाथ गर्जे, संतोष पवार ,संभाजी इंगळे, साळुंके बी एस, ज्ञानेश्वर लटपटे, गाडे पी एस, संपत कवडे ,संभाजी देशमुख, ज्ञानेश्वर शेटे, एनसीसी प्रमुख मयूर भोसले ,अशोक सांगळे,आशा शेकडे, सविता आंधळे, पालक माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुरुकुल पालक समिती अध्यक्ष म्हणून जालिंदर यादव व उपाध्यक्ष अनिता गीते ताई यांची सर्व पालकाच्या सहमतीने निवड करण्यात आली .
यावेळी प्राचार्य मडके बी के यांनी गुरुकुल प्रकल्प, उपक्रम स्पर्धा परीक्षा या संदर्भात सविस्तर माहिती पालकांना दिली.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुरुकुल प्रकल्प महत्त्वाचा आहे असे मनोगत व्यक्त केले.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक यादव यांनी पालकाच्या वतीने विद्यालयाला आम्ही सर्वतोपरी मदत करू व विद्यार्थी शिक्षक पालक यामध्ये समन्वय साधू विद्यालयाला येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यास सहकार्य करू असे मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचलन संभाजी इंगळे आभार प्रदर्शन सोमीनाथ गर्जे यांनी केले.





