रिक्षा चालकाचा प्रमाणिकपणा!!! महिलेची विसरलेली बॅग व सोने जामखेड पोलीसांच्या मदतीने केले परत

0
224

 

जामखेड प्रतिनिधी

             जामखेड न्युज——

घरची आर्थिक परिस्थिती बिकट आसुन देखील जामखेड येथील रीक्षा चालक सादीक शेख यांनी कसलाच लालचीपणा न दाखवता जामखेड पोलिसांच्या मदतीने त्याच्या रिक्षात विसरलेले गळ्यातील सोने व बॅग प्रामाणिकपणे पुन्हा महिलेच्या ताब्यात दिले. त्यामुळे आजुनही प्रामाणिकपणा हरवलेला नाही ते वरील घटनेवरून दिसुन येत आहे.

 

रिक्षाच्या तोडक्यामोडक्या कमाईवर घर चालवणाऱ्या सादीक गुलाब शेख रा. मोरे वस्ती, जामखेड हे आपली रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतात. नेहमी प्रमाणे सकाळी बस स्थानक येथुन एका महिला प्रवाशाचे भाडे घेऊन त्यांना घरी सोडले.

 

यानंतर पुन्हा त्यांना दुसऱ्या महीला प्रवाशी आसलेल्या सुनिता हजारे यांनी जुन्या बस स्थानकाजवळ रिक्षाला हात दाखवला व रिक्षा थांबवुन घरी सोडण्यासाठी सांगितले या वेळी त्यांच्या कडे एक सामानाची बॅग होती. या बॅग मधे सोन्याचे दागिने देखील होते. हजारे यांना घरी सोडल्यावर मात्र त्यांची बॅग त्यांच्या कडून रीक्षामध्येच विसरली. या नंतर रिक्षाचालक सादीक शेख यांनी दोन तीन महिलांचे देखील रिक्षाचे भाडे केले. मात्र उशिरा त्यांना रीक्षात एक बॅग प्रवाशी महीला विसरलेली आहे हे लक्षात आले. मात्र बॅग घेण्यासाठी कोणीच आले नसल्याने व नेमकी कोणत्या महीलेची बॅग विसरली आहे हे माहीत नसल्याने शेवटी ती बॅग जामखेड पोलीस स्टेशनला घेऊन गेले व पोलीसांनकडे जमा केली. यानंतर जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सदर बॅग बाबत दिवसभर माहिती घेतली असता ती बॅग जामखेड शहरातील शिवाजी नगर भागात राहणार्‍या सुनिता हजारे यांची आसल्याची खात्री केली. या नंतर दि ९ रोजी रात्री सदर महिलेस जामखेड पोलीस स्टेशनला बोलवुन सोने व बॅग महीलेकडे सुपूर्द केली. त्यामुळे या महीलेने सर्वांचे अभार मानले. रिक्षाचालक सादीक शेख याने दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी त्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत कौतुक केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here