जामखेड न्युज——
एकनाथ शिंदेंना आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच महापूजेचा बहुमान मिळाला.आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली.पहाटे ०२:०० च्या सुमारास विठ्ठल- रखुमाई यांची शासकीय महापूजा करण्यात आली. विशेष म्हणजे, विठ्ठलाच्या शासकीय पूजेला शिंदे घराण्याच्या चार पिढ्याही उपस्थित होत्या. एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांचा नातू रुद्रांश शिंदे विठोबा चरणी पाहायला मिळालं. मुख्यमंत्र्यांसोबत गेवराई (ता. बीड) च्या नवले दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मान मिळाला. मुरली भगवान नवले (वय ५२) व जिजाबाई मुरली नवले (४७) यांनी शासकीय महापूजा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत केली.यावेळी मुख्यमंत्र्यांनी टाळ वाजवत हरिनामाचा गजर केला. तर, त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलं होतं.शिवाय, मुख्यमंत्र्यांच्या पत्नीनं महिलांसोबत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.आजचा दिवस आपल्या जीवनातील सर्वात आनंदाचा, महत्वाचा दिवस आहे. पांडुरंगाची कृपा, आई वडीलांची पुण्याई यांच्या मुळे आज महाराष्ट्रारातील बारा कोटी जनतेच्या वतीने आपल्याला पूजा करण्याची संधी मिळाली. अशी भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. कोरोनामुळे मागील दोन वर्ष निर्बंधात पंढरपुरातील आषाढी वारी पार पडली होती. मात्र यंदा आषाढी वारी निर्बंधमुक्त पार पडत आहे. वारीसाठी राज्याच्या कानाकोपर्यातून १२ लाखांहून आधिक भाविक दाखल झाले आहेत.

आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली
पहाटे ०२:०० च्या सुमारास विठ्ठल- रखुमाई यांची शासकीय महापूजा करण्यात आली. विशेष म्हणजे, विठ्ठलाच्या शासकीय पूजेला शिंदे घराण्याच्या चार पिढ्याही उपस्थित होत्या. एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांचा नातू रुद्रांश शिंदे विठोबा चरणी पाहायला मिळालं.

मुख्यमंत्र्यांसोबत गेवराई (ता. बीड) च्या नवले दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मान मिळाला. मुरली भगवान नवले (वय ५२) व जिजाबाई मुरली नवले (४७) यांनी शासकीय महापूजा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत केली.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी टाळ वाजवत हरिनामाचा गजर केला. तर, त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलं होतं शिवाय, मुख्यमंत्र्यांच्या पत्नीनं महिलांसोबत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.
आजचा दिवस आपल्या जीवनातील सर्वात आनंदाचा, महत्वाचा दिवस आहे. पांडुरंगाची कृपा, आई वडीलांची पुण्याई यांच्या मुळे आज महाराष्ट्रारातील बारा कोटी जनतेच्या वतीने आपल्याला पूजा करण्याची संधी मिळाली. अशी भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.
कोरोनामुळे मागील दोन वर्ष निर्बंधात पंढरपुरातील आषाढी वारी पार पडली होती. मात्र यंदा आषाढी वारी निर्बंधमुक्त पार पडत आहे. वारीसाठी राज्याच्या कानाकोपर्यातून १२ लाखांहून आधिक भाविक दाखल झाले आहेत.