जामखेड न्युज – – – –
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना करोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक होणार असून या बैठकीला उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहतील असं नाना पटोले यांनी यावेळी सांगितलं.
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री कार्यालयाकडून मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. याआधी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनाही करोनाची लागण झाली आहे.