जामखेड न्युज – – –
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत जामखेड तालुक्याचे सुपुत्र व व आहिल्यादेवी होळकर यांच्या माहेरचे वंशज असलेले माजी मंत्री प्रा. राम शिंदेंचा विधान परिषदे निवडणूकत अपेक्षित तितकाच अभूतपूर्व विजय मिळवल्याने चोंडीसह मुंबई व कर्जत जामखेड मध्ये समर्थकांनी मोठ्या प्रमाणात आनंद उत्साह साजरा केला.
जामखेडला दुसर्यांदा दुसरा आमदार मिळाला आहे आगोदर विधानपरिषदेवर रामदास फुटाणे सहा वर्षे आमदार होते आता प्रा. राम शिंदे ही सहा वर्षे आमदार राहणार आहेत. कर्जत-जामखेड मधील कार्यकर्ते एकदम कोमात गेले होते पण प्रा. राम शिंदे यांना पुन्हा संधी मिळाली तेव्हा परत कार्यकर्ते जोमात आले आहेत.
या निवडणुकीमध्ये माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या निकालाकडे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे सर्वाधिक लक्ष लागले होते. निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये राम शिंदे यांची विधान परिषदेत वर्णी लागणार हे जवळपास स्पष्ट झाले होते. भाजपने राम शिंदे यांच्या एकनिष्ठतेवर विश्वास दाखवत त्यांना विधान परिषदेची आमदारकी बहाल केली.
दि. २० जून रोजी निकाल जाहीर होताच गावागावातील आ. प्रा. राम शिंदे समर्थक आणि भाजपा कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताश्यांच्या गजरात विजयोत्सव साजरा केला. विजयानंतर माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पेढा भरून आ. शिंदेंचे अभिनंदन केले.
या विजयीत्सवात भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत (दादा) पाटील, गिरीश महाजन तसेच जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शरद कार्ले, भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सलिम बागवान, रवि सुरवसे, माजी नगरसेवक अमित चिंतामणी, युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष मोहन गडदे, डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, ॲड. प्रविण सानप, सोमनाथ राळेभात, सोमनाथ पाचरणे, वैजिनाथ पाटील, अनिल लोखंडे, गोरख घनवट, पांडुरंग माने, अर्जुन म्हेत्रे, मनोज कुलकर्णी, ईश्वर मुरुमकर, बाजीराव गोपाळघरे, मोहन देवकाते , उपसरपंच आप्पा ढगे, राहुल राऊत, डॉ. विठ्ठल राळेभात, डॉ. अनभुले, डॉ. गणेश जगताप, प्रसिद्धी प्रमुख उद्धव हुलगुंडे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान माजी मंत्री राम शिंदे यांच्या विजयाची बातमी जामखेड व कर्जत तालुक्यांत पसरताच शिंदे समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत विजयोत्सव साजरा केला. तसेच आ. प्रा. राम शिंदे यांची जन्मभूमी असलेल्या चोंडीमध्येही यावेळी राम शिंदे यांच्या मातोश्री भामाबाई शिंदे यांच्यासमवेत गावकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी विजयाचा उत्सव साजरा केला. काल सायंकाळपासूनच आ. शिंदे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्ये व गावकऱ्यांनी गर्दी केली होती. विजयाची घोषणा होताच गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी व ढोल – ताशांच्या गजरात गावकऱ्यांनी विजयोत्सव साजरा केला.
आपला मुलगा पुन्हा आमदार झाला याचा आनंद भामाबाई शिंदे यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता , यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तथा प्रसिद्धीप्रमुख सचिन पोटरे, माजी उपसरपंच वर्षाराणी उबाळे, अनिल उबाळे, अजिंक्य शिंदे, दादा सोनवणे, राजू टकले, राजू उबाळे, शंकर शिंदे, सुदर्शन भोंडवे, गोकुळ सामसे, भारत माने, विजय भांडवलकर, बाबासाहेब भांडवलकर, सुनील मधुकर उबाळे, बाबासाहेब सोनवणे, उषाबाई भांडवलकर, शुभांगी उबाळे, जालिंदर उबाळे, खंडू शिंदे, किरण मोरे, नितीन मोरे, भाग्यश्री कोकाटे, मीना उबाळे, अक्षय उबाळे, रितेश मोरे, तुषार उबाळे, शिवाजी भांड, शिवाजी उबाळे, शुभम मोरे, गणेश उबाळे, सुदर्शन शिंदे, सुजित शिंदे, साजन राजगुरू, अशोक राजगुरू, दिलीप जगदाळे, माजी सरपंच आभिमान सोनवणे, सागर मांगले, भारत शिंदे, विनोद सोनवणे, दत्ता उबाळे सह आदी यावेळी उपस्थित होते.




