मंत्री शंकरराव गडाख मतदानकेंद्रातून थेट रूग्णालयात

0
220
जामखेड न्युज – – – – 
 विधानपरिषदेच्या सहा रिक्त जागांसाठी सध्या मतदान प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी मुंबईत गेलेले राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ( Shannkarrao Gadakh ) यांच्या मणक्यात वेदना होत असल्याने त्यांना रिलायन्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
विधानपरिषदेच्या मतदानाची प्रक्रिया आज सकाळपासून सुरू आहे. शिवसेनेचे सर्व आमदार पवई येथील वेस्टइन हॉटेलमध्ये होते. मंत्री गडाख हे मतदानासाठी गेले असता त्यांचे जुने दुखणे पुन्हा उद्भवले. त्यामुळे त्याच्या मणक्याचा त्रास होत असल्याचे सांगितले जात आहे.
त्यांना स्लीप डिस्कची समस्या निर्माण झाली आहे. त्यांना मुंबईतील खासगी रुग्णालयात चार दिवसांपासून उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांनी मतदान केल्यावर ते पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. विधानपरिषदेचे मतदान करण्यासाठी जाताना व्हील चेअर वर गेले. तेथे सेनेचे आमदार तसेच विधानपरिषदेचे उपसभापती नरहरी झिरवळ, शिरुरचे आमदार अशोक पवार, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी गेटवर जात गडाख यांची विचारपूस केली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्यांची विचारपूस करून काळजी घ्या असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here