महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट कायम दररोजच वाढतायेत रूग्ण

0
255
जामखेड न्युज – – – – 
देशासह राज्यात कोरोनाचा दैनंदिन आक़डा वाढतच चालला आहे. आजही समोर आलेली कोरोनाची आकडेवारी धडकी भरवणारी आहे. राज्यासह मुंबईची आकडेवारी देखील चिंताजनक आहे. त्यामुळे राज्य लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करतेय की काय अशी भीती सतावतेय.
राज्यात आज 4 हजार 4 रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाचे 23,746 सक्रिय रुग्ण झाले आहेत. तर राज्यात आज एका कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोनाचे आज 2087 रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईचीही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे.
राज्यातील व मुंबईतील कोरोनाचा आकडा गेल्या अनेक दिवसांपासून खुप वाढतोय. राज्यात तर सलग 4 हजार पार रूग्ण सापडत आहेत. त्यामुळे राज्य सरकारसह आरोग्य विभागाची चिंता वाढलीय. सातत्याने मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित सापडतायेत. त्यामुळे कुठेतरी राज्यावर कोरोना निर्बंध लागण्याी शक्यता नाकारता येत नाही.
जूनमध्ये असा वाढला संसर्ग
रविवार 19 जून : 4 हजार 4 
शनिवार 18 जून : 3 हजार 883
शुक्रवार 17 जून : 4 हजार 165
गुरुवार 16 जून :  4 हजार 255
बुधवार 15 जून : 4 हजार 24
मंगळवार 14 जून : 2 हजार 956 
सोमवार 13 जून : 1 हजार 885
रविवार 12 जून :  2 हजार 946   
शनिवार 11 जून : 2 हजार 922
शुक्रवार 10 जून  : 3 हजार 81 
गुरुवार 9 जून : 2 हजार 813 
बुधवार 8 जून :  2 हजार 701 
मंगळवार 7 जून : 1 हजार 881 
सोमवार 6 जून :  1 हजार 36  
रविवार 5 जून : 1 हजार 494
शनिवार 4 जून :  1 हजार 357
शुक्रवार 3 जून : 1 हजार 134 
गुरुवार 2 जून : 1 हजार 45

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here