जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – – –
“जे तुम्ही सोसलं, ते पुढच्या पिढीला सोसावं लागत असेल ते योग्य नाही. त्यामुळे पारधी समाजातील बांधवांनी मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे यासाठी जिल्हा परिषदेच्या मदतीने या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. कोरोना काळामध्ये सरकारने जेव्हा निर्णय घेतला की, अनुसूचित जमातीच्या बांधवाना खावटी अनुदान योजना द्यायची. तेंव्हा स्थानिक शिक्षक, अधिकारी, सरपंच, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदिंच्या मदतीने सर्वेक्षण करून या लोकांना खावटी अनुदान योजना देण्याचे आम्ही प्रयत्न केले. यातूनच राज्य सरकारच्या मदतीने आज प्रत्येक लाभार्थ्यास ८ पत्रे देत आहोत, या योजना फक्त आदिवासी भागामध्येच देता येतात असे अनेकांना वाटतं. मात्र पारधी समाज एस. टी. या प्रवर्गात येत असल्याने त्यांच्यापर्यंत ही मदत पोहचणे तितकेच महत्वाचे आहे.
तसेच या समाजाने बचत गटाच्या माध्यमातून एकत्र यावे तसेच महिलांनी यामध्ये सहभागी व्हावे बचत गटासाठी ताकद देण्याचे आश्वासन आ. रोहित पवार यांनी केले.
जामखेड येथिल तहसील कार्यालयात आदिवासी विकास विभाग नाशिक व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजुर यांचे मार्फत आयोजित पन्हाळी पत्रे वाटप कार्यक्रम दि. १३ जून रोजी आ. रोहित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशसरचिटणीस राजेंद्र कोठारी, तहासिलदार योगेश चंद्रे , शहराध्यक्ष राजेंद्र गोरे , आदिवासी पारधी महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रवादी सरचिटणीस प्रकाश काळे, नगरसेवक मोहन पवार, नगरसेवक दिगांबर चव्हाण, नगरसेवक अमित जाधव, नगरसेवक पवन राळेभात, अँड. हर्षल डोके, युवा उद्योजक प्रविण उगले, नासिर सय्यद, वसीम सय्यद ( मंडपवाले ), सागर शिंदे, शासकीय अधिकारी, कर्मचारी व स्थानिक कार्यकर्ते व आदिवासी पारधी महासंघाचे तालुका अध्यक्ष दादासाहेब पवार, संतोष पिंपळे, अल्का पिंपळे, लक्ष्मी पवार, जयश्री हातलगे आदी लाभार्थी उपस्थित होते.
अहमदनगर जिल्ह्यात प्रामुख्याने जामखेड, कर्जत, श्रीगोंदा या ३ तालुक्यात तसेच राहूरी, पाथर्डी या तालुक्यात राजूर प्रकल्पाच्या माध्यमातून प्रामुख्याने ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविली गेली आहे. महाराष्ट्रामध्ये ४५ जातीमध्ये पारधी समाज निर्वासित असून पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी प्रत्येक कुटुंबाला ८ पत्रे दिले जातात . त्यानुसार १०० कुटुंबाला प्रत्येकी ८ पत्रे देण्यात आले आहेत व आता १३३ लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका समन्वयक सचिन कदम यांनी केले .