जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
वैद्यकीय क्षेत्रात खुप अपप्रवृत्ती आहेत पण गोरगरीब लोकांची रूग्ण सेवा करून डॉक्टर शिंदे बंधुंनी वैद्यकीय क्षेत्रात मोठा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या चांगल्या सेवेमुळेच आज भव्य दिव्य हाॅस्पिटल उभे राहिले आहे असे मत आमदार रोहित पवारांनी व्यक्त केले.

दत्त बालरुग्णालय या डॉ. शिंदे बंधुंच्या हाॅस्पिटलचे उद्घाटन आमदार रोहित पवारांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेंद्र कोठारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, रत्नदीप मेडिकल फौंडेशनचे भास्कर मोरे, मंगेश आजबे, सुंदरददास बिरंगळ, राहुल उगले, डॉ. महेश शिंदे,डॉ. विकास शिंदे साकतचे सरपंच हनुमंत पाटील, बावीचे सरपंच निलेश पवार, सावरगावचे सरपंच काळा चव्हाण, कुसडगावचे सरपंच बापुसाहेब कार्ले, काका कोल्हे, दादा उगले, काँग्रेसचे राहुल उगले,
महेश निमोणकर, बजरंग मुळे, हळगावचे किसनराव ढवळे,
अमोल बिरंगळ यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, वैद्यकीय सेवा सुविधा वाढल्या कि अर्थव्यवस्थेला चांगली
गती येते. गोरगरीब रूग्णांना चांगले उपचार मिळावेत म्हणून आपण महात्मा फुले जीवनदायी योजना सुरु केली आहे या योजनेत आणखी काही गंभीर आजारांचा समावेश करणार आहोत.
डॉक्टरांनी चांगली सेवा दिली कि लोकांचा विश्वास संपादन होतो डॉ. शिंदे बंधुंनी तो संपादन केला आहे. कर्जत-जामखेड मध्ये डॉक्टरवर हल्ले होणार नाहीत यांची संपुर्ण काळजी घेतली जाईल. सध्या कर्जत-जामखेड मध्ये रस्ते, वीज, पाणी, वैद्यकीय सुविधा, बसस्थानक, मंदिरे याचा चांगल्या पद्धतीने विकास होत आहे असेही सांगितले. यासाठी व्हिजन महत्त्वाचे असते.
यावेळी बोलताना डॉ. महेश शिंदे म्हणाले की,
साडेतीन वर्षात सहा हजार पेशन्ट वर शस्त्रक्रिया केल्या
पंधरा ते सोळा हजार बालरूग्णांवर उपचार केले आहेत सामान्य माणसाची सेवा करू कोणाचीही हेळसांड होणार नाही असे आश्वासन दिले.
यावेळी डॉक्टर भास्कर मोरे, राजेंद्र कोठारी, दत्तात्रय वारे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली व हाॅस्पिटलला शुभेच्छा दिल्या.
चौकट
खासदार डॉ सुजय विखे-पाटील व मी जामखेड शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावला आहे. थोड्याच दिवसात शहराला जोडणारे रस्ते व शहरातील रस्ते भव्य दिव्य असे फोर लेंथ असतील
आमदार रोहित पवार