Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या श्री साकेश्वर सायन्स ज्युनियर कॉलेजचा बारावीचा निकाल...

संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या श्री साकेश्वर सायन्स ज्युनियर कॉलेजचा बारावीचा निकाल १००% तर जय हनुमानचा निकाल ९९.५३%

0
414

जामखेड प्रतिनिधी

           जामखेड न्युज – – – –
संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या श्री साकेश्वर सायन्स ज्युनियर कॉलेज साकत चा बारावीची निकाल १००%  तर जय हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोल्हेवाडी पो. साकतचा निकाल ९९.५३% लागला आहे. संस्थेचे आपल्या निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण वराट, सचिव प्रा. कैलास वराट, प्राचार्य व शिक्षक वृंद यांनी केले आहे.
    साकत सारख्या दुर्गम भागात वराट बंधुंनी दहा वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून साकेश्वर सायन्स ज्युनियर कॉलेज व जय हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सुरू केले आज मोठा वटवृक्ष निर्माण झाला आहे. हजारो विद्यार्थी आज या शिक्षण संस्थेत शिक्षण घेत आहेत. महाराष्ट्रातील अनेक मेडिकल व इंजिनिअरिंग काॅलेज मध्ये या संस्थेचे विद्यार्थी आहेत. संस्थेने आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी हि संस्था आकर्षण ठरली आहे.
श्री साकेश्वर ज्युनियर कॉलेजचा निकाल १००% लागला असून प्रथम कोंडेकर पारस ९४.६७%, द्वितीय झांजे संस्कृती ९४.००%, तृतीय चांडक पलक ९३.१६% तर  कांबळे आर्या ९३.००% गुण संपादन केले आहेत.
  काॅलेजमध्ये नव्वद टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणारे २३ विद्यार्थी आहेत. ८५ ते ९० % गुण मिळवणारे ८३ विद्यार्थी आहेत तर ८० ते ८५ %  गुण मिळवणारे ४३ विद्यार्थी आहेत. आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा काॅलेजने कायम ठेवली आहे.
संस्थेच्या दुसर्‍या जय हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९९.५३% लागला आहे. यामध्ये प्रथम क्रमांक हलकंचे तनया ९२.३३% घोडके प्रगती ९२.३३%,
द्वितीय क्रमांक तावरे अभिषेक ९२.१६%, भोंडवे शिवम ९२.१६%तर तृतीय क्रमांक नरवणे सत्यम ९१.८३%, झगडे अर्णव ९१.८३,एकशिंगे संजीवनी ९२.८३ अशा प्रकारे क्रमांक पटकावले आहेत.
  ९० %पेक्षा जास्त गुण मिळवणारे ३१ विद्यार्थी आहेत तर ८५ ते ९० % गुण मिळवणारे १०२ विद्यार्थी आहेत ८० ते ८५%% गुण मिळवणारे ४८ विद्यार्थी आहेत.
संस्थेने आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे. संस्थेचे वैशिष्ट्य निसर्गरम्य व सुसज्ज इमारत, प्रवरा पॅटर्न नुसार अध्ययन पद्धती, एम एस. सीईटी नीट जेईई परीक्षेचे जादा तास, वैयक्तिक लक्ष, शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून Crop Science विषयास मंजुरी,
अनुभवी प्राध्यापक वृंद, भव्य क्रिडांगण आहे काॅलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी अनेक विद्यार्थी इच्छुक आहेत अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण वराट यांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!