Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या वीस हजारांची लाच घेताना कर्जतच्या पोलीस हवालदारास पकडले नगरच्या पथकाची कारवाई

वीस हजारांची लाच घेताना कर्जतच्या पोलीस हवालदारास पकडले नगरच्या पथकाची कारवाई

0
210
जामखेड न्युज – – – 
कर्जत पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अण्णासाहेब बाबुराव चव्हाण यांना २० हजारांची लाच घेताना नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.
या बाबत मिळालेली हकीकत अशी की यातील तक्रारदारा विरोधात कर्जत पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यांमध्ये मदत करण्यासाठी पोलीस हवालदार अण्णासाहेब बाबुराव चव्हाण यांनी ३०,०००ची मागणी केली होती. तक्रारदार यांनी याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर येथे दिलेल्या तक्रारीवरून दिनांक ०६/०६/२०२२ रोजी कर्जत येथे केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये आरोपी लोकसेवक याने तक्रारदार यांचे कडे ₹ ३०,०००/- ची मागणी करुन तडजोड अंती ₹ २०,०००/- स्विकारण्याचे मान्य केले होते.
त्यावरून आज मंगळवारी राशिन येथे लावलेल्या सापळ्यात पोलीस हवालदार अण्णासाहेब बाबुराव चव्हाण याने लाचेची रक्कम ₹ २०,०००/- पंचासमक्ष तक्रारदार यांचे कडुन भिगवण रोडवरील खरात हॉस्पिटलसमोर स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले पोलीस हवालदार अण्णासाहेब बाबुराव चव्हाण याच्या विरुद्ध कर्जत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.डाॅ.शरदराव गोर्डे :-पो हवालदार संतोष शिंदे, पो नाईक रमेश चौधरी, विजय गंगुल. पो अंमलदार वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, महिला पोलीस नाईक राधा खेमनर, संध्या म्हस्के, चालक पो ह. हरुन शेख, राहुल डोळसे पथकाने ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!