Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या नगरपरिषद हद्दीत किरकोळ फळ विक्रेत्यांना पर्यायी जागा द्यावी. ॲड. डॉ. अरुण जाधव 

नगरपरिषद हद्दीत किरकोळ फळ विक्रेत्यांना पर्यायी जागा द्यावी. ॲड. डॉ. अरुण जाधव 

0
332
जामखेड न्युज – – – – 
किरकोळ  फळ विक्रेते हे जामखेड शहरातील रहिवाशी असून गेली अनेक वर्षापासून फळे विकून स्वतःची व कुटुंबाची  उपजीविका भागवत आहे. नगरपरिषद हद्दीतील जागेवर फळांचा गाडा लावून शासकीय नियमाप्रमाणे कर आदा करून फळ विक्री करत आहेत. परंतु आता त्या जागेवरती नगरपरिषद शॉपिंग सेंटरचे बांधकाम करणार आहे. त्या फळ विक्रेत्यांना त्या जागेवरून तुमचे दुकान काढा असे सांगण्यात आले आहे. परंतु त्याना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी असे निवेदन तहसीलदार योगेश चंद्रे यांना अॅड डॉ. अरूण जाधव यांच्या नेतृत्वाखाली दिले आहे.
आज दिनांक ०६/०६/२०२२ रोजी किरकोळ फळ विक्रेत्यांना जागा मिळावी. यासाठी ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार योगेश चंद्रे साहेब यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ॲड. डॉ. अरूण जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. की किरकोळ  फळ विक्रेते हे जामखेड शहरातील रहिवाशी असून गेली अनेक वर्षापासून फळे विकून स्वतःची व कुटुंबाची  उपजीविका भागवत आहे. नगरपरिषद हद्दीतील जागेवर फळांचा गाडा लावून शासकीय नियमाप्रमाणे कर आदा करून फळ विक्री करत आहेत. परंतु आता त्या जागेवरती नगरपरिषद शॉपिंग सेंटरचे बांधकाम करणार आहे. त्या फळ विक्रेत्यांना त्या जागेवरून तुमचे दुकान काढा असे सांगण्यात आले आहे. परंतु त्याना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. पर्यायी जागा दिल्यास  फळ विक्रेते त्या जाग्यावर जाण्यास तयार आहे. आपणच ती जागा दाखवून द्यावे. त्या ठिकाणी सगळे फळाचे गाडी लावून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतील अशी भूमिका त्यांनी मांडली. बापुसाहेब ओहोळ यांनी ही भूमिका मांडली की हे फळ विक्रेते गरीब आहेत इमानदार आहे. कधी त्यांनी नगरपरिषदेची जागा बळकावण्याचे काम केले नाही. त्यांना फळ विक्रीसाठी नगरपरिषदेने जागा उपलब्ध करून द्यावी अशी भूमिका मांडली. यावेळी उपस्थित..  मा. सुरेश जाधव, (मा सरपंच) मा. अजिनाथ शिंदे (शहर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी जामखेड), द्वारकाताई पवार, जमीर बागवान, आय्यास बागवान, सोहेल बागवान, फिरोज बागवान, सुनील शिंदे, हुसेन बागवान, असलम बागवान, याकूब बागवान, वजीर बागवान, अजहर बागवान, वसीम बागवान, सचिन  साळवे, अनिस बागवान, इरफान बागवान, समीर बागवान, सुरेश पवार, सचिन पवार, गौतम भाकरे, व सर्व फळ विक्रेते व इतर व्यवसायिक दुकानदार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!