जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
जामखेड येथिल तौरस एन्टरप्राइजेसचे संचालक पंकज शेळके यांना उत्कृष्ट अॅटोमॅटिक फायर फायटर मॅन्युफॅक्चर्स या श्रेणीमध्ये राज्यस्तरीय महाराष्ट्र बिझनेस आयकाँन २०२२ चा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यामुळे जामखेडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. यामुळे विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विन पंडित यांच्या हस्ते शेळके यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शेळके यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित रेडमॅटीक फायर फायटरचे उत्पादनाचा राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतात नावलौकिक आहे. उत्कृष्ट उत्पादन व्यवसायातील आधुनिकता या सर्व गोष्टींचे संशोधन करून रिसेल रिसर्च या संस्थेने या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
यावेळी मनोगत व्यक्त करताना पंकज शेळके म्हणाले की, आज मिळालेला पुरस्कार हा माझा एकट्याचा नाही माझे आयडॉल असलेले माझे वडील माझा परिवार तसेच माझ्यावर प्रेम करणारे विविध मान्यवर मित्र परिवार यांचा हा सन्मान आहे.









