Saturday, February 14, 2026
Home ताज्या बातम्या मुलाला वाचवण्यासाठी आईने घेतली पाण्यात उडी, इंद्रायणी नदीत बुडून माय-लेकांचा मृत्यू!!

मुलाला वाचवण्यासाठी आईने घेतली पाण्यात उडी, इंद्रायणी नदीत बुडून माय-लेकांचा मृत्यू!!

0
225
जामखेड न्युज – – – – 
पुण्यातून (Pune) एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नदी पात्रात बुडत असलेल्या मुलाला वाचवण्यासाठी आईने पाण्यात उडी (mother jumps in river to save son) घेतली. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने माय-लेकरांचा बुडून मृत्यू (Mother and Son drowned) झाला आहे. मावळमधील कामशेत (Kamshet) येथील नायगाव येथे ही घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पूनम शिंदे आणि युवराज शिंदे अशी मृतक माय-लेकरांची नावे आहेत.
आई पूनम शिंदे आणि मुलगा युवराज शिंदे हे दोघेही इंद्रायणी नदी पात्रात गोधड्या धुण्यासाठी गेले होते. त्याचवेळी युवराज हा पाण्यात पडला. आपल्या मुलाला पाण्यात पडल्याचं पाहून आईनेही कसलाही विचार न करता त्याचे प्राण वाचवण्यासाठी लगेचच नदीत उडी घेतली. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने आई आणि मुलगा हे दोघेही बुडू लागले.
दोघेही पाण्यात बुडू लागल्याने जवळच पूनम शिंदेचा भाऊ होता. त्याने माय लेकराला वाचविण्यासाठी धाव घेतली. त्याने दोन्ही माय-लेकरांना पाण्याबाहेर बेशुद्धावस्थेत काढले. त्यानंतर उपचारासाठी महावीर हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचे डॉक्टर विखेश मुथा यांनी घोषित केले. या घटनेचा अधिक तपास कामशेत पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!