Saturday, February 14, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड महाविद्यालयाची पर्यावरण संदेश रॅली’

जामखेड महाविद्यालयाची पर्यावरण संदेश रॅली’

0
367
जामखेड न्युज – – – – – 
     जामखेड महाविद्यालयाच्या वतीने आज  ‘पर्यावरण जनजागृती संदेश रँली’चे आयोजन करण्यात आले होते.
५ जून हा दिवस ‘पर्यावरण दिन’ म्हणून जगभर विविध उपक्रमांनी साजरा केला जातो.
  संस्थेचे अध्यक्ष मा. उद्धव ( बापू) देशमुख, उपाध्यक्ष अरुण (काका)  चिंतामणी व सचिव शशिकांत देशमुख यांचे  मार्गदर्शन या अनुषंगाने जामखेड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल नरके यांच्या संकल्पनेतून जामखेड शहरामध्ये पर्यावरण जनजागृती संदेश रँली व वृक्षदिंडी काढण्यात आली. सकाळी ९ वाजता महाविद्यालयातून प्र. प्राचार्य सुनिल नरके व प्रा. मधुकर(आबा) राळेभात यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रँलीला सुरुवात झाली. ही रँली तहसिल कार्यालय, कोर्ट रोड, जयहिंद चौक, नवीन बस स्टँड, खाडे नगर, तपनेश्वर रोड, खर्डा चौक, बीड रोड, मराठी शाळा असे मार्गक्रमण करुन महाविद्यालयात रँलीचा समारोप करण्यात आला.
     राष्ट्रीय सेवा योजना विभाग, एन सी सी विभागाचे स्वयंसेवक विद्यार्थी हातामध्ये संदेशफलक घेऊन उत्साहाने सहभागी झाले होते. प्रचार फलक सायकल रिक्षा हे विषेश आकर्षक बणवण्यात आली होती. हातामध्ये वृक्षरोपे घेऊन संगीत गीतांचे तालावर जनजागृती घोषणा देणारे उत्साही स्वयंसेवक असे आगळेवेगळे चित्र पहावयास मिळत होते.
    या संदेश रँलीचे जामखेड शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.
सुमारे दोनशे विद्यार्थी या अभियानात सहभागी झाले होते.
     या रँलीचा समारोप झाल्यानंतर एक व्याख्यान आयोजित केले होते . यामध्ये प्रा मधुकर राळेभात, प्रा. शाम गोलेकर यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात प्र. प्राचार्य डॉ. सुनिल नरके यांनी  अनेक बाबींचे विश्लेषण केले. आपला देश सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर असताना आपण पर्यावरणाच्या प्रगतीकडे डोळेझाक करून चालणार नाही. निसर्गावर अन्याय करतो हे आपण सुनामी, सागरी वादळे, भूकंप, ढग फूटी, महापूर, दुष्काळ रोगराई अशा अनेक नैसर्गिक प्रकोपाद्वारे जाणवला आहे.    पर्यावरण संवर्धनासाठी तरुणांना मार्गदर्शन करुन पर्यावरण संरक्षण व संवर्धन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार प्रा.गौतम केळकर तर सूत्रसंचालन प्रा.तुकाराम घोगरदरे यांनी केले. प्रा. तुकाराम घोगरदरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून पर्यावरणाच्या विविध बाबींवर प्रकाश टाकला
 या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी  डॉ. रंगनाथ सुपेकर, प्रा. धनाजी पवार, प्रा.नितीन तरटे, प्रा. शिवाजी राळेभात,  प्रा. ऋषीकेश देशमुख, प्रा. योगेश पेटकर, प्रा. नितीन राऊत, प्रा. तुषार मिसाळ श्री. किशोर सातपुते, श्री. गायकवाड, श्री. सोनवणे, श्री.  म्हेत्रे यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!