जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
राजमाता पायलीच्या पन्नास पडल्यात, महाराण्या फुटाफुटावर सापडतील’, तसेच अहिल्यादेवी होळकर यांचाही एकेरी उल्लेख केला असे चौंडी येथे वक्तव्य करणार्या माजी आमदार अनिल गोटेंचा जामखेड येथे आहिल्याप्रेमी व शिवप्रेमींनी निषेध करत त्यांच्या प्रतिमेस जोडे मारुन तहसील कार्यालयासमोर प्रतिमा दहन करण्यात आली.
चौंडी येथे ३१ मे रोजी अहिल्यादेवी होळकर जयंती च्या कार्यक्रमात माजी आमदार अनिल गोटे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या जामखेड येथील आहील्याप्रेमी व शिवप्रेमींनी या वक्तव्याचा जाहीर निषेध करीत खर्डा चौका पासुन तहसील कार्यालया पर्यंत निषेध रॅली काढली. या वेळी आहिल्याप्रेमी व शिवप्रेमींनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना म्हणाले की माजी आमदार अनिल गोटेंचे वय झाले आसल्याने बुध्दी भ्रष्ट झाली आहे. बेताल वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील आहिल्याप्रेमी व शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आसल्याने त्यांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्या तोंडाला डांबर फासल्याशिवाय राहणार नाहीत. एकीकडे हनुमान चालीसा म्हंटल्यावर गुन्हे दाखल होतात आणि राष्ट्रकार्य करणार्या असंख्य राजमाता व महाराणी यांच्या विषयी खालच्या पातळीवर जाऊन बेजबाबदार व्यक्तव्य करणार्यावर काहीच कारवाई होत नाही हे विशेष आहे. विषेश म्हणजे चौंडी येथिल कार्यक्रमात व्यासपीठावर मंत्रमंडळातील मंत्री, पालकमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ नेते शरद पवार हे देखील उपस्थित होते मात्र यातील कोणीच त्यांना बोलतान थांबवले नाही किंवा माफी मागायला लावली नाही. व्यासपीठावर उपस्थित आसलेल्या सर्वच मुग गिळून गप्प बसलेल्या आणि माजी आमदाराच्या या वक्तव्याविषयी चकार शब्दही न काढणार्या नेते मंडळींचा देखील आम्ही सर्व शिवप्रेमी व ग्रामस्थ निषेध करतो.
या वक्तव्याला जबाबदार आसलेल्या माजी आमदार अनिल गोटे यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करुन कारवाई करावी अन्यथा तहसील कार्यालयासमोर आठ दिवसात अमरण उपोषण करण्याचा इशारा देखील शिवप्रेमींनी दिला आहे. यानंतर नायब मनोज भोसेकर यांना निवेदन देण्यात आले व माजी आमदार अनिल गोटेंच्या प्रतिमेस जोडे मारुन त्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले.
यावेळी वेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडूराजे भोसले, माजी सभापती डॉ.भगवान मुरूमकर, मनसे ता.अध्यक्ष प्रदिप टापरे, मोहन गडदे, संजय खरात, नगरसेवक बिभिषण धनवडे, अभिजीत राळेभात , मोहन देवकते, गणेश जोशी, सचिन देशमुख, शिवकुमार डोंगरे, गोरख घनवट, प्रविण कसाब, रोहित मोरे, सचिन काशिद, पप्पू काशीद, भाऊ फोटफोडे, बंटी पाटील, जगन्नाथ म्हेत्रे, शरद फरांडे, उमेश रळेभात,महेश पवार, संकेत रोडे , शिवराज विटकर, आदित्य राजगुरू, सावता मोहळकर, कांतीलाल मंडके सह शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटना, मनसे जामखेड, भारतीय जनता पार्टी, व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवास समिती जामखेडचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




