जामखेड न्युज – – –
तालुक्यातील राजकीय दृष्ट्या प्रबळ समजली जाणारी धामणगाव सेवा संस्था हि अनेक वर्षांपासून भाजपाच्या ताब्यात होती. या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार रोहित पवारांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात तसेच नाहुलीचे सरपंच सचिन घुमरे यांच्या नेतृत्वाखाली संत नंदराम महाराज शेतकरी विकास पॅनल उभा केला व या पॅनलने सत्ताधारी विरोधी पॅनलला धुळ चारत तेराही जागा मताधिक्याने जिंकल्या त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
धामणगाव सेवा संस्था ही अनेक वर्षांपासून सरपंच महारुद्र महारनवर व चेअरमन सतिष घुमरे यांच्या ताब्यात होती यावेळी आमदार रोहित पवारांच्या मार्गदर्शनाखाली
जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात तसेच नाहुलीचे सरपंच सचिन घुमरे यांच्या नेतृत्वाखाली संत नंदराम महाराज शेतकरी विकास पॅनल उभा केला व या पॅनलने सत्ताधारी विरोधी पॅनलला धुळ चारत तेराही जागा मताधिक्याने जिंकल्या त्यामुळे बर्याच वर्षांनी धामणगाव सेवा संस्था हि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आली आहे.
नवनिर्वाचित संचालक मंडळ पुढीलप्रमाणे आहे.
घुमरे बापुराव, घुमरे लहू, घुमरे लक्ष्मण, घुमरे संतोष, गोरे सागर, महारनवर हौसराव, महारनवर नानासाहेब, निकम बाळासाहेब, थोरात पप्पाजी, घुमरे सईबाई, महारनवर सिताबाई, क्षिररसागर अमोल, घुमरे महावीर
अशा प्रकारे संचालक मंडळ मताधिक्याने विजयी झाले आहे निकाल जाहीर होताच गुलालाची उधळण व फटाक्यांच्या आतषबाजीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
नवनिर्वाचित संचालक मंडळाने अभिनंदन मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रोहित पवार, कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, पंचायत समितीचे सभापती सुर्यकांत मोरे, विजयसिंह गोलेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय वराट, साकतचे सरपंच हनुमंत पाटील, युवक काँग्रेसचे अध्यक्ष शरद शिंदे, प्रशांत शिंदे यांच्या सह अनेकांनी अभिनंदन केले आहे.




