जामखेड न्युज – – –
जामखेडमध्ये अवैध शस्त्र मोठ्या प्रमाणावर असल्याचे अनेक वेळा झालेल्या घटनांवरून स्पष्ट झाले आहे. दि १ जून रोजी जामखेड शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या नागेश शाळा रोडवरील अक्सा मस्जिद परिसरात आपसातील भांडणावरून दहशत निर्माण करण्यासाठी सकाळी ११.३० वा च्या सुमारास एकाने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यामुळे शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
सदरील गोळीबारातुन संबंधीताने दहशत निर्माण करण्याचा
प्रयत्न केल्याची चर्चा आहे. सदर गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून भीतीदायक चर्चा आहे. याबाबत पोलीस स्टेशनला आद्याप कोणतीही तक्रार दाखल नसल्याचे समजले. नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने कायम वादग्रस्त राहिलेले व राजकीय आश्रय असलेले लोक अशी अवैद्य शस्त्र बाळगून आहेत. पोलीस प्रशासनाने अशा लोकांची झाडाझडती घेण्याची गरज आहे. अशी मागणी नागरिकांच्या चर्चेतून होत आहे.
शहर तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर अवैध शस्त्रे आहेत. पोलीसांनी त्याचा शोध घेऊन अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांना कडक शिक्षा केली पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



