Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या चौंडीतील खालच्या पातळीवरील भाषणामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर कर्जत मध्ये गुन्हा दाखल

चौंडीतील खालच्या पातळीवरील भाषणामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर कर्जत मध्ये गुन्हा दाखल

0
321
जामखेड न्युज – – – 
३१ मे रोजी चौंडी येथे कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे मंत्री व आमदार यांनी मोठ्या संख्येने चौंडी येथे जयंतीनिमित्त घेतलेल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.
चौंडी येथे जयंतीसाठी येत असलेल्या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी चापडगाव येथे अडवले होते. त्यांना आमदार रोहित पवार यांचा कार्यक्रम संपल्यावर आमदार गोपीचंद पडळकर कार्यकर्त्यांसह चौंडीत दाखल झाले होते. चौंडीतील रस्त्यावरच त्यांनी जमलेल्या लोकांसमोर आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी सांगितले की “मला चौंडी येथे येताना चापडगाव या ठिकाणी प्रशासनाने  अडविले; मला सरकारला सांगायचंय, माझा बाप मेंढरामागं दिवसाला 35 किलोमीटर चालतो. त्यामुळे तुम्ही आम्हाला किती अडवलं तरी तुम्ही आम्हाला येथे येण्यापासून रोखू शकत नाहीत. आमचा संघर्ष जातिवाद्यांशी आहे. आज मी मल्हारी मार्तंडाचे दर्शन घेऊन चौंडीत पोहचलो. अहिल्यादेवीच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला. मी येथे येण्यापूर्वी अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याला चुकीच्या व्यक्तींचे हात लागून झालेली विटंबना मी दुग्धाभिषेक करून धुवून काढली, असे त्यांनी सांगितले.
त्यांच्या या भाषणाचे पडसाद आता उमटू लागले असून काही धनगर संघटनांनीच आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात कर्जत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यात समाजा-समाजात तेढ निर्माण करणे, चिथावणीखोर वक्तव्य करणे, अशा विविध आरोपांचा समावेश आहे. कालच्या चौंडीतील भाषणानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात रविंद्र पांडुळे असे तक्रारदाराचे नाव आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!