जामखेड न्युज – – – –
राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या ३१ मे रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून सुशोभीकरण, रंगरंगोटी, डागडुजी तसेच स्वच्छता मोहिम व डेकोरेशन मंडप सह जोरदार जय्यत तयारी केली आहे. राज्यभरातून लाखो भाविक भक्त येणार आहेत त्यामुळे परिसर चकाचक असावा म्हणून जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने परिसराची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. सकाळी व सायंकाळी दररोज प्रत्येक कार्यकर्ता हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे. त्यामुळे परिसर चकाचक झाला आहे.
ADVERTISEMENT
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून चौंडी येथील बागेतील नवग्रह व राशीच्या परिक्रमा शिल्पांचे सुशोभीकरण, रंगरंगोटी काम युद्ध पातळीवर सुरू आहे तसेच महादेव मंदिर परिसरातील फरशी व वाड्यातील भुयारी लाईट व तडे गेलेल्या भिंतीची डागडुजी सुरू आहे तसेच कार्यक्रमासाठी येणाऱ्या कर्जत-जामखेड वरून येणार्या रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त या पवित्र भूमीची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. तसेच कार्यक्रम संपल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस संपुर्ण परिसराची स्वच्छता करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले.
रोहित पवार आमदार झाल्यापासून चौंडी गावचा विकास मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. तसेच जयंतीला सर्व पक्षीय नेत्यांनी व सर्व जातीधर्माच्या लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार रोहित पवारांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले.
दिवसभर भरगच्च कार्यक्रम
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती ३१ मे रोजी चौंडी येथे होणाऱ्या उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमांची रूपरेषा.!
१) सकाळी ९ ते १०: ह.भ.प रामायणाचार्य रामराव ढोक महाराज यांचे कीर्तन
२) सकाळी १० ते १ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम
३) सायं.६ वाजता : ५० कलाकारांची धनगरी झांज व ढोल वादनाने मानवंदना
४) सायं.६.३० वाजता : संबळ व हलगी यांची जुगलबंद
५) सायं.७ वाजता : उदघाटन
६) सायं.७.३० वाजता : शाहिरी/पोवाडे ( सादरकर्ते-शाहीर देवानंद माळी)
७)सायं.८ वाजता : मनोगत/संवाद(देवदत्त नागे, आदिती जलतरे)
८) सायं ८.३० ते १० वाजता : लोकगीते
सादरकर्ते – (उर्मिला धनगर, उत्कर्ष शिंदे,गणेश चंदनशीवे, अभिजित कोसंबी, प्रसन्नजीत कोसंबी,भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट ग्रुप)
— आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे असे आवाहन आमदार रोहित पवारांनी जामखेड न्युजशी बोलताना केले.