जामखेड न्युज – – –
चोंडी विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १३ जागेसाठी १४ उमेदवार रिंगणात आहेत. अनुसूचित जातीच्या एका जागेसाठी लढत असून उर्वरित १२ जागा बिनविरोध झाल्या. आ. रोहीत पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपकडून सत्ता हस्तगत केली आहे. माजी मंत्री राम शिंदे यांच्या गावात ग्रामपंचायत पाठोपाठ सेवा संस्था राष्ट्रवादी काँग्रेसने ताब्यात घेतली आहे.
चोंडी विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी १३ जागेसाठी १४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. दि. २० उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. परंतु अनुसूचित जाती जमातीच्या जागेवर दोन उमेदवारात एकमत झाले नाही. व तेथे निवडणूक होत आहे तर उर्वरित कर्जदार मतदार संघ, इतर मागास, भटक्या विमुक्त जाती जमाती व महिला मतदार संघातील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
बिनविरोध निवड झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे विलास जगदाळे, दत्तात्रय उबाळे, दत्तात्रय भांडवलकर, बाबूराव शिंदे, अनिल शिंदे, संदीप शेळके, महमंद गुलाब शेख, किसन बोराटे, अशोक भगत, वच्छला भांडवलकर, पुष्पावती देवकर, अशोक देवकर या सर्व बिनविरोध उमेदवारांचे चोंडी ग्रामपंचायतचे सरपंच सुनिल उबाळे यांनी फेटा बांधून सत्कार केला.