जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – – –
जामखेड तालुक्यातील बसरवाडी या ठिकाणी दहा वर्षांपुर्वी झालेल्या भांडणा मध्ये एक लहान मुलगी मध्ये आल्याने या मुलीस आरोपीने धारधार शस्त्राने वार करून खून केला होता. या नंतर आरोपी दादा महादेव मुटके हा फरार झाला होता. अखेर या फरार आरोपीस अहमदनगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला या आरोपीस तब्बल दहा वर्षांनी जेरबंद करण्यात यश आले आहे.
अधिक माहिती अशी की फीर्यादी रामदास सुखदेव फाळके वय ६० रा. बसरवाडी शिऊर. ता. जामखेड याच्या सुनेच्या फीर्यादीचे पुतणे यांनी छेड काढल्याने त्यांच्या विरुद्ध जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता. याची केस न्यायालयात चालु होती. या कारणावरून फीर्यादी व आरोपी यांची वारंवार भांडणे होत होती.
दि ११/७/२०१२ रोजी पहाटे फीर्यादी च्या घरासमोर मागिल भांडणाच्या कारणावरून संबंधित आरोपी सह फरार आरोपी दादा मुटके यांनी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने एकत्र येऊन फीर्यादी ची पत्नी जलदाबाई या लघुशंकेसाठी उठल्या आसता त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी त्यांची नात संगीता ही मध्ये पळत आली तीस मारहाण करुन काहीतरी धारधार शस्त्राने गळ्यावर मारुन खुन केला होता. या बाबत जामखेड पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी आरोपी दादा महादेव मुटके रा. बसरवाडी ता. जामखेड हा फरार झाला होता.
पोलिस अधीक्षक मनोज पाटील अहमदनगर यांनी जिल्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेऊन कारवाई करणे बाबत पो.नि .अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना आदेश दिले होते. याच अनुषंगाने बसरवाडी येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी दादा मुटके हा मागील दहा वर्षांपासून फरार होता. सदर आरोपी जामखेड येथे स्वतःची ओळख लपवुन रहात होता. तो गावातील बसरवाडी येथे एक जाणाच्या घराच्या बांधकामासाठी आलेला आसल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहीत झाली. त्या नुसार पथकातील सपोनि सोपान गोरे, सखाराम मोटे, भाऊसाहेब कुरूंद, विश्वास बेरड, मनोहर गोसावी, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, लक्ष्मण खोकले, विजय ठोंबरे, संतोष लोंढे, रवि सोनटक्के, भाग्यश्री भिटे, ज्योती शिंदे, चंद्रकांन्त कुसळकर, यांच्या पथकाने जामखेड परीसरात आरोपीचा शोध घेत बसरवाडी येथे छापा टाकून पकडले व जामखेड पोलीस स्टेशनला हजर केले.
सदर कारवाई अहमदनगर चे पोलीस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अगरवाल कर्जत जामखेड चे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.