जामखेड न्युज – – – –
पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, जामखेड पोलिस स्टेशनयांच्या मार्गदर्शनाखाली व लोकाग्रहास्तव पुन्हा एकदा उद्या दिनांक 22/05/2022 रोजी जामखेड पोलिस स्टेशन व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हाळगाव या दोन ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी जास्तीत जास्त तरूणांनी रक्तदान करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी केले आहे.
ADVERTISEMENT 

1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात मुस्लिम समाजातील समाजातील नागरिकांना रमजान महिन्याचे उपवास असल्याने रक्तदान करण्यात आले नव्हते तसेच काही नागरिक बाहेरगावी असल्याने त्यांना रक्तदान करण्यात आले नव्हते अशा नागरिकांनी खास मागणी केल्याने पुन्हा एकदा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. त्यामुळे आज रक्तदान हे सर्वश्रेष् दान आहे. त्यामुळे तरूणांनी जास्तीत जास्त रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे
जामखेड पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या संकल्पनेतून एक मे रोजी जामखेड शहरासह दहा ठिकाणी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यात सुमारे एक हजार बाटल्यांचे संकलन करण्यात आले होते. पण रमजान मुळे मुस्लिम बांधवांना रक्तदान करता आले नव्हते त्यामुळे परत रक्तदानाचे संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे जामखेड पोलीस स्टेशन व हळगाव येथे आयोजित रक्तदान शिबीरात तरूणांनी जास्तीत जास्त तरूणांनी सहभागी व्हावे असे आवाहन पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी केले आहे.





