जामखेड न्युज – – – –
ग्रामीण भागात विवाह जत्रा – यात्रा विविध धार्मिक कार्यक्रम दोन वर्षाच्या खंडानंतर पुन्हा धुमधडाक्यात होत असल्याने भोजनाच्या पंगतीचा होऊ लागल्या आहेत . नागरिकांत उत्सव दिसत आहे. यात्रा जत्रा सण उत्सव, सप्ताह, लग्न कार्यात मोठ्या पंगती उठत आहेत. याचा उपभोग बाळ गोपाळांसह जनता आनंदाने घेत आहे.
ADVERTISEMENT 

कोरोना प्रादुर्भावामुळे जत्रा -यात्रा हरिनाम सप्ताह सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम विवाह सोहळा कोरोना नियमावाली मुळे कमी लोकात होत होते त्यामुळे ग्रामीण भागातील भोजनाच्या मेजवानी पंगती व जत्रा -यात्रा मधीला नाच – गाण्याचे प्रकार बंद झाले होते मात्र आत मोठया प्रमानावर पंगती होत आहेत तसेच जत्रा – यात्रा मध्ये लेझिम, तमाशे नृत्यकला ( डावा ) रंगतांना दिसतात व लोक त्यांचा आनंद लुटतांना दिसत आहेत .
मागील दोन वर्ष शासकीय निर्बंध होते त्यामुळे काही विवाह पुढे ढकलले काही शासकीय नियमाचे पालन करत कमी संख्येत साध्या पद्धतीने विवाह उरकले ग्रामीण भागात विशेषत: उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर धार्मिक सोहाळे होत असता त्यावेळी पंगती वर पंगती महाप्रसादाचा लाभ घेत असतात सप्ताह काळात रोज संध्याकाळी पंगत विवाहाला देखील मोठ्या संख्येने वर्हाडी मंडळी नातेवाईक ओळखीचे राजकीय मंडळी उपस्थित राहतात
धुमधडाक्याती लग्नामुळे वर- वधु मंडीचा खर्च वाढला
कोरोनाच्या काळात कांदा पोहे चहा गाजा वाजा न करता घरातीन मंडळीत लग्न झाले नंतर पन्नास ते शंभर व्यक्तीत लग्न झाले आता मात्र धुमधडाक्यात लग्न होत असले तरी वर- वधुकडील मंडळीना लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत .





