पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा, ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त, ४९ जण ताब्यात परभणी पोलीसांची कारवाई

0
509
जामखेड न्युज – – – – 
 परभणीचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांना गोपनीय माहिती मिळाली होती. पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहिती वरुन मौजे पारवा शिवारातील परभणी ते पाथरी रोडवरील राष्ट्रमाता मॉं जिजाऊ सेवाभावी संस्था, पारवा शिवार येथे छापा टाकला. येथील पत्र्याच्या शेडवर छापा टाकून तिर्रट जुगार खेळणाऱ्या ४९ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी यावेळी ३२ लाख ९२ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे परभणी शहरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत.
परभणी जिल्ह्यात पोलीस अधीक्षक जयंत मीना व अपर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, उप विभागीय पोलीस अधिकारी परभणी शहर, उपविभागीय पोलीस अधिकारी परभणी ग्रामीण सिरतोड यांनी अवैध धंद्यांवर कारवाई केली आहे.सहाय्यक पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांना जुगार सुरु असल्यासंदर्भात गोपनीय माहिती मिळाली होती. परभणी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे पारवा शिवारात परभणी ते पाथरी रोडवरील राष्ट्रमाता मॉं जिजाऊ सेवाभावी संस्था पारवा शिवार येथे पत्र्याच्या शेडवर पोलिसांनी छापा टाकला.
पोलिसांना डी. एस. कदम हा पत्त्यावर जुगार खेळवतो अशी खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीवरुन पोलिसांनी छापा मारला. तेथे दत्तात्रय श्रीरंगराव कदम (रा.दत्त नगर , परभणी) हा लोकांना पैशावर पत्याचा जुगार खेळवताना सापडला.
काँग्रेस राष्ट्रीय नसून भावा बहिणीचा पक्ष राहिलाय, प्रादेशिक पक्षही जे.पी. नड्डांच्या निशाण्यावरपोलिसांनी यावेळी कारवाई करत एकूण ४९ आरोपींना पत्यावर जुगार खेळताना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी कारवाई दरम्यान तिर्रट जुगार खेळण्याचे साहित्य, वाहन, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ३२ लाख ९२ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी या आरोपींविरद्ध पोलीस स्टेशन परभणी ग्रामीण येथे कलम १८८ भा.दं.वि.सह कलम ४ व ५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळं परभणीतील अवैध व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here