जामखेड न्युज – – – –
शेकडो सैनिक तयार करणारी तसेच जामखेड परिसरातील नागरिकांच्या निरामय आरोग्यासाठी सुसज्ज मैदान तसेच सुरक्षित वातावरण अनेक सुविधा निर्माण करणारी शिवनेरी स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमीतर्फे आपल्या पाल्यांच्या भवितव्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. समर हाॅलिडे व्हॅकेशन अॅक्टीव्हिटी सैनिक ट्रेनिंग सुरू करण्यात आले आहे. त्या संधीचा फायदा परिसरातील पालकांनी घ्यावा व आपल्या पाल्याचे व्यक्तीमत्व विकसित करावे असे आवाहन शिवनेरी अकॅडमीतर्फे करण्यात आले आहे.
या वीस दिवसात आपल्या पाल्याचे फिजिकल ट्रेनिंग, मास ड्रील, मास पीटी, योगा, एकाग्रता, स्पोर्ट्स, व्यक्तीमत्व विकास, नेमबाजी, फायरिंग, एनडीए प्रवेश परिक्षा माहिती, बाॅक्सींग, स्टडी, वक्तृत्व स्पर्धा, अनुशासन, वेळेचे महत्त्व, व्यसनमुक्ती, आत्मविश्वास, स्पर्धा परीक्षा माहिती, आई-वडील गुरूंची सेवा, आर्मी लाइफ व सुविधा इत्यादी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन होणार आहे त्यामुळे आजच आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन शिवनेरी स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमीचे संचालक कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी जामखेड न्युजशी बोलताना केले.
उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पाल्यासाठी नेमके काय करायचे हा आई-वडिलांना मोठा प्रश्न पडतो. घरी आपण कितीही प्रयत्न केला तरी मुलांमध्ये शिकण्याची इच्छाशक्ती उत्पन्न होत नाही. त्यासाठी काहीतरी नवीन म्हणजेच सर्वांचे आवडते शिक्षण म्हणजेच सैनिक प्रशिक्षण यात मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी व सुदृढ!! धैर्यवान!! व अनुशासित बनण्यासाठी विद्यार्थ्यांना ही संधी मिळताच त्यांच्यामध्ये नक्कीच बदल होतो व एक देश प्रेमाची भावना जागृत होते याच वयात जसा आकार देऊ इच्छितो तसा आकार व दिशा मिळते यासाठी नक्कीच एक वेळा जरूर आजच आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी व जीवनशैलीमध्ये बदल करण्यासाठी आजच निर्णय घ्या व फक्त 20 दिवस पाल्यास आमच्याकडे द्या नक्कीच बदल झाल्याशिवाय राहणार नाही संपर्क करा व येणाऱ्या 20 मे पासून आपल्या पाल्याची सैनिक ट्रेनिंग जॉईन करा संपर्क मो. नं. 91 58 00 66 63